लाच घेऊनही ४० अधिकारी सेवेत, फक्त १३ जणांवरच दोषसिद्ध


लाच घेऊनही ४० अधिकारी सेवेत, फक्त १३ जणांवरच दोषसिद्ध
SHARES

‘लाचखोरांविरुद्ध कारवाई हा निर्धार’ असा ध्यास असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा दि. २७ ऑक्टोबर २०२० ते ०२ नोव्हेंबर २०२० या कालावधीत ‘दक्षता जनजागृती सप्ताह-२०२०’ साजरा सध्या सुरू आहे. मात्र  दुसरीकडे लाच घेताना रंगेहाथ पकडून सुद्धा आजही ४० जण सेवेत  कार्यरत असल्याची धक्कादायक माहीती एसीबीने सादर केलेल्या आकडेवारीतून समोर आली आहे. तर आतापर्यंत केलेल्या शेकडो आरोपींपैकी फक्त १३ जणांवर दोषसिद्ध करण्यात एसीबीला यश आल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.

हेही वाचाः- कोरोना इफेक्ट : रुग्णांमध्ये आढळतोय मल्टीसिस्टम प्रक्षोभक सिंड्रोम

लॉकडाऊननंतर मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने(एसीबी) पून्हा एकदा जोर धरला आहे. एसीबीने केलेल्या कारवाईत चालू वर्षाची आणि मागील वर्षाची तुलना केली असता. मागच्या वर्षीच्या तुलनेत २८ टक्क्यांनी घट झाली आहे. एसीबीने १० महिन्यात ५०६ कारवाई केली आहे. त्यात ६९४ आरोपींना अटक केली आहे. तर २०१९ मध्ये ७०६ कारवाई करण्यात आल्या असून ९५९ जणांना अटक करण्यात आली होती. एसीबीने आतापर्यंत केलेल्या कारवाईत सर्वाधिक पुण्यात कारवाई केलेल्या आहेत. पुण्यात ११८ कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर नाशिक ८७, अमरावती ७९, नागपूर ७५, औरंगाबाद ६७, नांदेड ६१, ठाणे ३५ आणि मुंबईत १८ गुन्ह्यांची नोंद आहे.

हेही वाचाः- मुंबईतल्या गॅस गळतीचा शोध लावण्यासाठी पालिकेनं पाठवला मसुदा

एसीबीचे प्रमाण जरी कमी झाले असले तरी पूर्णतहा राज्यातील भ्रष्टाचार अद्याप संपलेला नाही. मूळात एसीबीने त्याच्या बेवसाईटवर जारी केलेल्या आकडेवारीतून आतापर्यंत केलेल्या ५०६ कारवाईतून ६९४ जणांना जरी अटक केली असली. तरी त्यातील फक्त १३ जणांवर गुन्हे सिद्ध करण्यात एसीबीला यश आल्याचे आकडेवारीत म्हटले आहे. तर लाच घेऊन सुद्धा आजही सेवेतून ४० अधिकाऱ्यांवर निलंबन किंवा बडतर्फची कारवाई झालेली नाही.  

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा