दगड मारून मोबाईल लांबवणारे अटकेत

 Oshiwara
दगड मारून मोबाईल लांबवणारे अटकेत

गोरेगाव - ओशिवरा डेपोजवळ रात्रीच्या वेळी दगड मारण्याची धमकी देऊन मोबाईल घेऊन पळ काढणाऱ्या दोघांना बांगुरनगर पोलिसांनी अटक केली आहे. सनी सोनावणे आणि सोनू वाघमारे अशी या दोघांची नावे आहेत. दोघांना गोरेगावमधून अटक करण्यात आली आहे.

ओशिवरा बस डेपोजवळ या दोघांनी एका सुरक्षा रक्षकाला दगड मारण्याची धमकी दिली. अालोक कुमार झा असे या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. जर मोबाईल नाही दिला तर दगड मारू अशी धमकी या दोघांनी दिली होती. त्यानंतर सुरक्षा रक्षकाकडून मोबाईल चोरून दोघांनी पळ काढला. याप्रकरणी सुरक्षा रक्षकाने बांगुरनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यावर पोलिसांनी सापळा रचून या दोघांना अटक केली.

Loading Comments