धारावीत पोलिसांवर दगडफेक, दहा जणांवर गुन्हे दाखल


धारावीत पोलिसांवर दगडफेक, दहा जणांवर गुन्हे दाखल
SHARES

धारावी येथे  पोलिसांवरच दगडफेक केल्याप्रकरणी 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी दोघांना धारावी पोलिसांनी अटक केली आहे. परिसरात होणारी गर्दी हटवण्यासाठी पोलिस गेले असतानात ही दगडफेक करण्यात आली होती.

धारावी परिसरात एका स्थानिक राजकीय पदाधिकाऱयाकडून काही नागरीकांना जेवण वाटले जाते. पण धारावी परिसरात रुग्ण सापडल्यामुळे नागरीकांची गर्दीवर विशेष लक्ष ठेवण्याचे आदेश अतिरिक्त पोलिस आयुक्तांनी धारावी पोलिसांना दिले होते. त्याचवेळी धारावी पोलिसांनी या गर्दीतील नागरीकांना मोकळ्या ठिकाणी जेवण वाटप कार्यक्रम करण्याचे सांगितले. त्यावरून वाद झाला. त्यानंतर गर्दीतील काही नागीरकांनी पोलिसांवर दगडफेक केली होती. याप्रकरणी धारावी पोलिसांनी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी 10 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सर्वाची ओळख पटली असून त्यातील दोघांना अटक करण्यात आली आहे.

तर लॉकडाऊनचा आदेश धाब्यावर बसवून खुलेआम संचारकेल्याप्रकरणी राज्यभरात साडे दहा हजार गुन्हे दाखल करण्यात आले. त्यात मुंबई पोलिसंनी 1364 व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल केले असून 1100 जणांना आतापर्यंत अटक केली आहे. याशिवाय समाज माध्यमांवर अफवा पसरवल्याप्रकरणी राज्यातील विविध सायबर पोलिसांनी 51 गुन्हे दाखल केले आहेत. राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये हे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मुंबईतही अफवा पसरवल्याप्रकरणी तीन गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा