Corona virus: ड्रंक अॅण्ड ड्राइव्हची कारवाई थांबवा

ब्रिथ अॅनालाईजरद्वारे हा रोग पसरण्याची शक्यता वर्तवत वरिष्ठ पोलिसांनी मुंबईतील वाहतूक पोलिसांनी काही दिवस ही कारवाई थांबवण्याचे आदेश दिले

Corona virus: ड्रंक अॅण्ड ड्राइव्हची कारवाई थांबवा
SHARES

देशभरात कोरोना या संसर्ग रोगाने थैमान घातले आहे. महाराष्ट्रात कोरोना या संसर्ग रोगाची ३९ जणांना बाधा झाली आहे. हा संसर्ग जन्य रोग असल्यामुळे पोलिसांच्या ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह कारवाईत वापरल्या जाणाऱ्या ब्रिथ अॅनालाईजरद्वारे हा रोग पसरण्याची शक्यता वर्तवत वरिष्ठ पोलिसांनी  मुंबईतील वाहतूक पोलिसांनी काही दिवस ही कारवाई थांबवण्याचे आदेश दिले आहेत. 

हेही वाचाः- Corona virus: ५०% कर्मचाऱ्यांच्या आधारावर काम करा - पालिका

 सातत्याने समोर येणारे कोरोना व्हायरसचे नवे रुग्ण चिंतेत भर घालत आहेत. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. खाजगी कंपन्यांनी केवळ ५०% स्टाफच्या आधारावर काम चालवावे, असे आदेश मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रविण परदेशी यांनी दिले आहेत. कोरोनाच्या रुग्णांची संख्या आणखी वाढू नये म्हणून विषाणुचा प्रसार रोखण्यासाठी कोरोनाचे रुग्ण असलेल्या रुग्णालयांच्या जवळची वाहतूक बंद करण्याचे आदेश पालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी दिले आहेत.त्यासाठी पालिका आयुक्तांनी परिपत्रक काढले आहे. त्याच बरोबर गर्दीची ठिकाणी नागरिक एकत्रित जमू नये या उद्देशाने  शाळा, स्विमिंग पूल, जिम, चित्रपटगृह बंद ठेवावीत असे निर्देशही पालिका आयुक्तांनी दिले आहेत.

 हेही वाचाः- Coronavirus Updates: एसटी कर्मचारीही घालणार मास्क, कोरोना टाळण्यासाठी उपाय

सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलिस मुंबईतल्या ठिक ठिकाणी नाकाबंदी करून वाहतूकीच्या नियमांचे उल्लघंन करणाऱ्यांविरोधात कारवाई करतात. मात्र या कारवाई दरम्यान वापरण्यात येणारे  ब्रिथ अॅनालाईजर हा रोग बळवाण्याची शक्यता आहे. शिवाय पोलिस कर्मचाऱ्यांना ही या रोगाची बाधा होऊ शकते. त्या अनुशंगाने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी वाहतूक विभागीय चौक्यांना काही दिवस ड्रंक अॅण्ड ड्राइव्हची कारवाई थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहे. 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा