सात शाळकरी मुलांनी कापली हाताची नस

 Santacruz
सात शाळकरी मुलांनी कापली हाताची नस

मुंबई - मुंबईच्या सांताक्रूझ परिसरातल्या एका शाळेतील सात मुलांनी शाळेतच आपल्या हाताची नस कापल्याने एकच खळबळ उडाली आहे. सातवीत शिकणारे हे विद्यार्थी सेठ चिमणलाल नथुराम शाळेचे विद्यार्थी असून स्टंट करण्याच्या नादात मुलांनी हा प्रकार केल्याचं समोर आलं आहे. सात विद्यार्थ्यांमध्ये तीन मुलींचा समावेश असून एका मुलीने तब्बल 30 वेळा आपल्या हातावर वार केले आहेत.

सांगितलं जातंय की मंगळावरी मधल्या सुट्टीत एका विद्यार्थ्याने शार्पनरचे ब्लेड घेतले आणि या ब्लेडने वार करूनदेखील आपल्याला दुखणार नसल्याचा दावा मित्रांसमोर केला. तो एवढ्यावरच थांबला नाही तर आपल्या हातावर त्याने वार देखील केले. त्यानंतर हाच प्रकार सगळ्यांनी केला. चार मुलांनी आपल्या हातावर शार्पनरच्या ब्लेडने वार केले. त्यानंतर तिथे असलेल्या तीन मुलींनीही आपल्या हाताच्या नासा कापून घेतल्या. त्यावेळी कुणालाही काहीच कळू न देता हे विद्यार्थी घरी निघून गेले, त्यानंतर त्यांनी इंटरनेटवर अशा प्रकारच्या स्टंटने काही धोका किंवा दुखापत होणार नाही ना याचे व्हिडियो बघितले. दुसऱ्या दिवशी जेव्हा ही सगळी मुले शाळेत गेली तेव्हा सगळ्यांच्या हाताला बँडेज बघून शिक्षकांना संशय आला. मुलांना विचारल्यानंतर हा सगळा प्रकार उजेडात आला.

इंटरनेटवरील अशा प्रकारच्या व्हिडिओने प्रभावित न होण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना शाळेने दिलाच आहे. पण पालकांनादेखील काळजी घेण्याचा सल्ला शाळेकडून देण्यात आला आहे.

Loading Comments