बाइकस्टंटनं घेतला तरुणाचा बळी

मुंबई - रस्त्यांवर भरधाव वेगानं, सुसाट बाइक चालवणं, पाहणारे अरे अरे म्हणून ओरडत असतानाही धूम स्टाइलनं वाऱ्याशी स्पर्धा करणं आजकाल ठिकठिकाणी चालतं. हे स्टंट जीवावर बेतू शकतात, याचंही भान वेगाची झिंग चढल्यावर रहात नाही... असाच प्रकार वांद्रे रेक्लेमेशनला घडलाय... तुम्ही पाहताय ही आग एखाद्या फटाक्यामुळे लागलेली नाही. बाइकची रेस सुरू होती आणि त्यात तीन बाइक्स एकमेकांवर आदळल्या. त्यामुळे एका बाइकनं जागीच पेट घेतला. या भीषण अपघातात अभिजीत गुरव नावाच्या 22 वर्षांच्या तरुणाला प्राण गमवावे लागले. पाच जखमींना भाभा रुग्णालयात नेण्यात आलंय. त्यांच्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचं समजतंय. हा व्हिडिओ तिथेच असलेल्या एका बाइकस्वारानं शूट केलाय. वांद्रे रेक्लेमेशनमध्ये असे स्टंट नेहमी केले जातात. त्याचा परिसरातल्या रहिवाशांना मोठा त्रास होतो.

Loading Comments