हिंदुजामध्ये कंत्राटी कामगाराचा आत्महत्येचा प्रयत्न


हिंदुजामध्ये कंत्राटी कामगाराचा आत्महत्येचा प्रयत्न
SHARES

जिथे जगण्याची आशा घेऊन रुग्ण रुग्णालयात येतात, तिथेच जर एखादा आत्महत्येसारखा प्रयत्न होत असेल तर? आश्चर्य वाटलं असेल ना? पण हा प्रकार घडलाय आणि तोही मुंबईतील प्रसिद्ध रुग्णालयापैकी एक असलेल्या हिंदुजा रुग्णालयात!


कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न गंभीर

मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात शुक्रवारी एका कर्मचाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी सेवेत घेत नसल्याने व्यवस्थापनाविरोधात अनेक कर्मचारी नाराज आहेत. त्याच नैराश्यातून हा आत्महत्येचा प्रयत्न झाला.



सचिन बीडलान असं या कर्मचाऱ्याचं नाव असून, त्याने हॉस्पिटलमध्येच सकाळी ११ वाजता विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.


'मागण्या मान्य करा, अन्यथा निदर्शने करू'

हिंदुजा हॉस्पिटलमधील जवळपास २५० कर्मचारी हे कंत्राटी म्हणून काम करतात. गेल्या अनेक दिवसांपासून नियमानुसार कायमस्वरुपी कामावर रुजू करून घ्यावे, अशी मागणी हे कर्मचारी व्यवस्थापनाकडे करत आहेत. मात्र, हॉस्पिटलकडून कर्मचाऱ्यांना नकार मिळत आहे. त्यामुळे अनेक कर्मचारी निराश आहेत. त्यातूनच या तरुणाने हे पाऊल उचलल्याचं समजत आहे. दरम्यान, मनसे कामगार सेनेने हिंदुजा हॉस्पिटलला '२४ तासांत बाकीच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सुद्धा विचार करून निर्णय घ्यावा, अन्यथा निदर्शने करू', असा इशारा दिला आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा