रेल्वे कार्यालयात चीफ बुकिंग सुपरवायझरची आत्महत्या


रेल्वे कार्यालयात चीफ बुकिंग सुपरवायझरची आत्महत्या
SHARES

कोरोनातून मुंबई आणि मुंबईत राहणाऱ्यांची परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असताना धक्कादायक घटना समोर आली आहे. विद्याविहार रेल्वे स्थानकातील कार्यालयात एका कर्मचाऱ्यानं आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली आहे.

हेही वाचाः- ‘ते’ ट्विट चुकीने, ठाकरे सरकारमधील मंत्र्याची कबुली

मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील विद्याविहार रेल्वे स्थानक पश्चिम परिसरात असलेल्या कार्यालयात ही घटना घडली आहे. चीफ बुकिंग सुपरवायझर म्हणून काम करणाऱ्या 55 वर्षांच्या कैलास कदम यांनी टोकाचं पाऊल उचललं. सकाळी घरातून निघून थेट कार्यालयं गाठलं अन् काम सुरू करण्याआधीच त्यांनी स्वत:चं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.

हेही वाचाः- दिलासादायक! फ्लिपकार्ट आता मराठी भाषेत उपलब्ध

माहिती मिळताच घाटकोपर पोलीस आणि रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. चीफ बुकिंग सुपरवायझर म्हणून काम करणाऱ्या कैलास कदम यांनी गुरुवारी सकाळी रेल्वेच्या कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. कैलास कदम यांच्या आत्महत्यांचे कारण समोर आले नाही. मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालय येथे पाठवला आहे. या घटनेचा तपास घाटकोपर पोलीस करत आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा