सुटकेसमधला मृतदेह अजूनही अनोळखीच...

 Kurla
सुटकेसमधला मृतदेह अजूनही अनोळखीच...
सुटकेसमधला मृतदेह अजूनही अनोळखीच...
See all

कुर्ला - लोकमान्य टिळक टर्मिनसच्या पार्सल विभागाजवळ एका निर्जन ठिकाणी रविवारी रात्री एका १० वर्षांच्या मुलाचा मृतदेह टिळक नगर पोलिसांना आढळून आला होता. लाल रंगाच्या एका सुटकेसमध्ये हा मृतदेह अज्ञात इसमाने टाकला होता. या घटनेला २४ तास उलटूनही या मुलाची आदयापही ओळख पटलेली नाही. त्यामुळे टिळक नगर पोलिसांनी या तपासासाठी चार पथके तयारी केली असून गुन्हे शाखा देखील या हत्येचा संमातर तपास करत असल्याची माहिती टिळक नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खैरे यांनी दिली आहे. दरम्यान ही अज्ञात व्यक्ती मृतदेह असलेली सुटकेस घेऊन जातानाची दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस तपास करत आहेत.

Loading Comments