COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
53,44,063
Recovered:
47,67,053
Deaths:
80,512
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
36,674
1,447
Maharashtra
4,94,032
34,848

जिने ठेवला विश्वास, तिचाच केला कुलकर्णीने घात


जिने ठेवला विश्वास, तिचाच केला कुलकर्णीने घात
SHARES

सध्या चर्चेत असलेल्या शिफू संकृतीचा सर्वेसर्वा सुनील कुलकर्णीच्या कुकर्माचा पाढा संपण्याचे नाव घेत नाही. तरुण मुलामुलींना हेरुन त्यांना सेक्स आणि ड्रग्सच्या विळख्यात अडकविण्याच्या कथित आरोपानंतर आता ज्या दोन बहिणींना आश्रय देण्याचे ढोंग त्याने केले होते, त्यातील एका मुलीलाच या कुलकर्णीने फसवल्याचे समोर आले आहे.

सुनील कुलकर्णीच्या घराची झडती घेतल्यावर पोलिसांना तेथे मोठ्या मुलीचे चेकबुक सापडले. यातील एका चेकवर 15 लाख रूपयांची रक्कम टाकून त्यावर या मुलीची खोटी सही केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या नव्या खुलाशानंतर गुन्हे शाखेने कुलकर्णीविरोधात आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्याचीही नोंद केली आहे.

चेकवर खोटी सही करून पैसे वळवण्याचा प्रयत्न 
कुलकर्णीच्या घराच्या झडतीत मोठ्या मुलीचे चेकबुक गुन्हे शाखेच्या हाती लागले. या चेकबुक मधील चेक क्रमांक 102717 वर 15 लाख रुपयांची रक्कम टाकून हा चेक मॅक्सीकॉन हेल्थकेअरच्या नावाने काढण्यात आला होता. तसेच या चेकवर या मुलीची खोटी सहीदेखील केल्याचा पोलिसांचा दावा आहे. हे चेकबुक पोलिसांनी मुलीला दाखवल्यावर तिने हे चेकबुक ओळखले. पण चेकवरील सही आपली नसल्याचे तिने पोलिसांना स्पष्ट केले. एवढेच नव्हे, तर बँकेतील नोंदीत मुलीच्या घरचा पत्ता बदलल्याची देखील तिला माहिती नव्हती.

इव्हेंट मॅनेजमेंटसाठीही मुलीच्या नावाने करार
सुनील कुलकर्णी इव्हेंट मॅनेजमेंटचे कामेही घेत असल्याचे त्याच्या घरात सापडलेल्या कागदपत्रांवरून पुढे आले आहे. मेसर्स रामानी आईस्क्रीम लि. या भोपाळच्या कंपनीसोबत केलेल्या एका कराराची प्रत पोलिसांच्या हाती लागली असून हा करार त्याने चक्क या मुलीच्या नावाने केलेला आहे. विशेष म्हणजे या मुलीला अशा कुठल्याही कराराची माहिती नसल्याचे तिने पोलिसांना सांगितले आहे.
सुनील कुलकर्णीला 20 एप्रिलला अटक केल्यानंतर बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. गुन्हे शाखेने त्याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. मात्र न्यायालयाने ही मागणी फेटाळत कुलकर्णीची रवानगी न्यायालीयन कोठडीत केली आहे. सध्या कुलकर्णीला आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात आले आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा