दिग्दर्शक संजय लिला भन्साळीची ३ तास चौकशी

दरम्यान मागच्या आठवड्यात प्रसिद्ध दिग्दर्शन संजय लिला भन्सालीला चौकशीसाठी समन्स केले होते. त्यानुसार संजय लिला भन्साली हे पोलिस ठाण्यात हजर झाले आहे.

दिग्दर्शक संजय लिला भन्साळीची ३ तास चौकशी
SHARES

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात वांद्रे पोलिसांनी सोमवारी संजय लिला भन्साली यांची ३ तास चौकशी केली. बॉलिवूडमधील मोठ्या मीडिया हाऊसेसनी सुशांतला बॅन केल्याची चर्चा होती. याच कारणांवरून त्याने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याचे बोलले जात होते. त्यानुसार पोलिसांनी या  प्रकरणात खरचं घराणेशाही सुरू आहे का ? याचा तपास सुरू केला. त्यानुसार काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी यशराज फिल्मसला सुशांतसोबतचे क्राँन्ट्रेक्च लेटरची कागदपत्रे जमा करण्यास सांगितले होते. त्यानंतर सुशांतसोबत काम करणारी अभिनेत्री संजना सांघी हिची ७ तास चौकशी केली होती. दरम्यान सोमवारी  प्रसिद्ध दिग्दर्शन संजय लिला भन्सालीला चौकशीसाठी समन्स केले होते. त्यानुसार संजय लिला भन्साली हे पोलिस ठाण्यात हजर झाले आहे. 

हेही वाचाः- डोमिसाईल असेल तरच नोकरीची संधी, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

सुशांतसिंह राजपूत याचा अंतिम शवविच्छेदन अहवाल नुकताच प्राप्त झाला आहे. गळफास घेतल्यानेच सुशांतचा मृत्यू झाल्याचे त्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. मात्र त्याने इतके टोकाचे पाऊल का फचलले हे अद्याप गुलदस्त्यात आहेत. त्या प्रकऱणीच पोलिसांनी आतापर्यंत ३० जणांची चौकशी केली आहे.  पोलिसांनी प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लिला भन्साली याला काही दिवसांपूर्वी चौकशीसाठी समन्स पाठवला होता. त्यानुसार सोमवारी संजय लिला भन्साली हे सकाळी ११.३० च्या सुमारास चौकशीसाठी हजर झाले. तब्बल ३ तासाच्या चौकशीनंतर पोलिसांनी संजय लिला भन्साली यांना जाऊ दिले. पोलिसांनी भन्साली यांचा जबाब नोंदवून घेतला असून गरज पडल्यास त्यांना पून्हा बोलवण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवली जात आहे.  वांद्रे पोलिसांनी सुशांतसोबत शेवटात म्हणजेच ‘दिल बेचारा’ मध्येकाम करणारी अभिनेत्री संजना सांघीला हिला काही दिवसांपूर्वी चौकशीसाठी बोलावले होते. पोलिसांनी तिची तब्बल ७ तास चौकशी केली. काही महिन्यांपूर्वी 'मी-टू कैम्पेन' सुरू असताना संजनाने सुशांतवर तिची छेड काढल्याचा आरोप केला होता. त्यावेळी तिने सुशांतसोबत चॅटचे फोटो ही सोशल मिडियावर टाकल्याचे कळते. त्यावेळी सुशांतने या आरोपाचे खंडन केले होते.

हेही वाचाः- Mumbai Rains: मुंबईत पुढच्या २४ तासांत मुसळधार पावसाचा इशारा

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात भन्साली यांच्यावर ही सुशांतला डावलल्याचे आरोप करण्यात आले होते. संजय लिला भन्साली यांनी २ चित्रपटांसाठी सुशांतला विचारले होते.  मात्र ऐनवेळी त्या चित्रपटात सुशांत ऐवजी रणवीर सिंगला घेण्यात आले. ’रामलिला’ आणि ‘ बाजीराव मस्तानी’ या दोन्ही चित्रपटांनी थेअटरवर  बक्कळ पैसे कमवले.  सुशांतच्या  व्यस्त तारखेमुळे ऐनवेळी हे चित्रपटात रणवीरला देण्यात आल्याचे सांगितले जात होते. नेमकं यातच कारणांमुळे सुशांतला हे चित्रपट मिळाले नाहीत की यामागे काही वेगळं कारण आहे. की त्यामागे काही वेगळं कारण याबाबत पोलिसांनी भन्साली यांच्याकडे चौकशी केली गेल्याची शक्यता  आहे. भन्साली यांच्याप्रमाणे या प्रकरणात अन्य काही बड्या लोकांची चौकशी होण्याची शक्यता आहे. आतापर्यत पोलिसांनी या प्रकरणात ३० जणांची चौकशीकरून जबाब नोंदवलेला आहे. सुशांतने केलेल्या आत्महत्येला बॉलिवूडमधील घराणेशाही कारणीभूत असल्याचा आरोप केला जात होता. या प्रकरण बिहारमध्ये एकताकपूर, संजय लिला भन्साळी, करण जोहर आणि सलमान खानसह ८ जणांवर याचिकाही दाखल केली होती. या आरोपाला संजय लिला भन्साळीकडून पत्राद्वारे उत्तर ही पाठवले होते. त्यात संजय लिला भन्साळी यांनी मी सुशांतला चार चित्रपटात काम करण्याची आँफर केली होती. मात्र सुशांत काम करत असलेल्या चित्रपटांच्या तारखा आणि मी दिलेल्या तारखा या सारख्याच असल्यामुळे त्याने माझी आँफर स्विकारली नसल्याचे कळवले होते.

हेही वाचाः- Hotel & Restaurant: राज्यात ८ जुलैपासून हाॅटेल-लाॅज उघणार, रेस्टाॅरंटबाबत निर्णय प्रलंबित

तसेच मागच्या आठवड्यात सुशांतची बहिण आणि त्याचा मित्र महेश शेट्टी यांनी तपास अधिकाऱ्यांची भेट घेतल्याचे ही कळते. दोघांनी सुशांतच्या आत्महत्येचे कारण काही स्पष्ट झाले आहे का हे जाणून घेतल्याचे कळते. त्याच बरोबर सुशांतने आत्महत्या केलेल्या घरात तो भाड्याने रहात होता. त्या घराचे भाडे लाखोरुपये आहे. त्यामुळे ते घर म्हणजे च सुशांतच्या त्या घरातील वस्तू घेऊन ते घर खाली करण्याबाबत पोलिसांकडे परवानगी मागितली आहे. त्याच बरोबर सुशांतचे जे बँक अकांऊन्ट पोलिसांनी बंद केले आहेत. ते सुरू करण्याबाबत ही पोलिसांकडे विनंती केल्याचे कळते.

 सुशांत आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी यांची केली चौकशी

नीरज सिंह (कुक)

 केशव बचनेर (कुक)

दीपेश सावंत (घर का नॉकर)

सिद्धार्थ पीठानी (मैनेजर)

सावंत (मैनेजर )

सुशान्त की ३ बहनें

नीतू सिंह

मीतू सिंह

सुशान्त के पिता केके सिंह

चाभी बनाने वाला (२)

महेश शेट्टी (एक्टर और दोस्त)

मूकेश छाबरा (कास्टिंग डायरेक्टर)

श्रुति मोदी (बिजनेस मैनेजर)

राधिका तेहलानी (PR मैनेजर)

रिया चक्रबर्ती (सुशान्त की करीबी दोस्त)

संजना सांघी (अभिनेत्री)

आशिष पाटिल(YRF)पूर्व YRF कमर्चारी

आशिष सिंह (वाइस प्रेसिडेंट )YRF

शानू शर्मा कास्टिंग डायरेक्टर YRF

शोविक चक्रवर्ती (रिया का भाई और सुशान्त की कंपनी के डायरेक्टर

राधिका निहलानी (PR)

रोहणी अय्यर (मित्र औऱ पूर्व पीआर)

प्रियंका खिमानी (लीगल एडवाईजर सुशान्त सिंह)

उदय सिंह गौरी (टेलेंट मैनेजमेंट कम्पनी के मालिक)

कुशल झवेरी, मित्र

संजय श्रीधर , सीए.

२ बॉलीवुड वेब साइट्स के जनर्लिस्ट

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा