बसमध्ये आढळली संशयास्पद वस्तू


बसमध्ये आढळली संशयास्पद वस्तू
SHARES

प्रवाशांनी भरलेल्या बसमध्ये संशयास्पद वस्तू आढळल्याची घटना बुधवारी दुपारी चेंबूर येथे घडली. बॉम्बशोधक पथकाने तात्काळ या ठिकाणी धाव घेत बसमधील वस्तूंची तपासणी केली असता यामध्ये एका मशीनचे पार्ट आढळून आल्याने पोलिसांसह प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

माहुल गाव येथून घाटकोपर येथे जाणाऱ्या बसमार्ग क्रमांक 381 (बस क्रमांक एमएच-01,एल 9222) या बसमध्ये बुधवारी दुपारी संशयास्पद वस्तू आढळून आली. त्यामुळे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली होती. वाहकाने इतर प्रवाशांकडे विचारणा केली. मात्र कोणाचीच ती वस्तू नव्हती. त्यामुळे वाहकाने तत्काळ बस चालकाला ही बस चेंबूर पोलीस ठाणे येथे घेऊन जाण्यास सांगितले. पोलिसांना ही बाब सांगितल्यानंतर पोलिसांनी तात्काळ ही माहिती बॉम्बशोधक पथकाला दिली. त्यानुसार बॉम्ब शोधक पथकाने तपासणी केल्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा