गोरेगावमध्ये बंगाली गायिकेचा संशयास्पद मृत्यू

सुभाचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर सुभाच्या मृत्यूचे कारण समजू शकेल, त्यानंतर पुढे तपासाची दिशा ठरवता येईल, असं दिंडोशी पोलिसांनी सांगितलं आहे

गोरेगावमध्ये बंगाली गायिकेचा संशयास्पद मृत्यू
SHARES

मुंबईतील (Mumbai) गोरेगाव पूर्व भागात एका लग्न सोहळ्यात फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये परफॉर्म करण्यासाठी आलेली गायकी सुभा मुखर्जी यांचा (Shubh Mukherjee) संशयास्पद मृत्यू झाला आहे. तिच्या मृत्यूमुळे लग्न सोहळ्यात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी पोलिस अधिकतपास करत असल्याची माहिती ‘दैनिक भास्कर’ने दिली आहे.

हेही वाचाः- 'बेस्ट'मधील २ हजार ६९० कर्मचारी कोरोनामुक्त, ५२ जणांचा मृत्यू

सुभा मुखर्जी (५०) ही गोरेगाव पूर्व भागातील नागरी निवारा सोसायटीमध्ये राहत होती. गायक शैलेंद्र भारती यांनी सुभाला एका उद्योगपतीच्या लग्नात परफॉर्म करण्यासाठी २९ नोव्हेंबर रोजी वेस्ट इन हॉटेलमध्ये बोलावले होते. संध्याकाळी ७.३० च्या सुमारास अचानक सुभाची प्रकृती खालावली होती. त्यामुळे ती तिच्या रुममध्ये निघून गेली होती. आपल्या रूममध्ये आराम केल्यानंतर सुभा बाहेर आली असता हॉटेलच्या लॉबीमध्ये कोसळली. त्यानंतर शैलेंद्र भारती यांनी सुभाला तातडीने संजीवनी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. परंतु, डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले, सुभा मुखर्जीच्या मृत्यूमुळे एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचाः- झोमॅटो, स्विगीच्या कर्मचाऱ्यांची होणार चाचणी

 घटनेची माहिती मिळताच दिंडोशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुभाचा मृत्यू कशामुळे झाला याबद्दल पोलिसांनी अजून कोणताही अंदाज वर्तवला नाही. सुभाचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर सुभाच्या मृत्यूचे कारण समजू शकेल, त्यानंतर पुढे तपासाची दिशा ठरवता येईल, असं दिंडोशी पोलिसांनी सांगितलं आहे

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा