Advertisement

'बेस्ट'मधील २ हजार ६९० कर्मचारी कोरोनामुक्त, ५२ जणांचा मृत्यू

बेस्टमधील एकूण २ हजार ८३५ पैकी २ हजार ६९० कर्मचारी कोरोनामुक्त झाले असून यामधील ५२ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचं समोर येत आहे.

'बेस्ट'मधील २ हजार ६९० कर्मचारी कोरोनामुक्त, ५२ जणांचा मृत्यू
SHARES

मुंबईसह आसपासच्या परिसरातील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वाहतूक सेवा पुरविणाऱ्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांना आपला जीव धोक्या घालून सेवा द्यावी लागत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत लॉकडाऊन करण्यात आला होता. या लॉकडाऊनच्या काळातही कर्मचाऱ्यांनी सेवा पुरवली. मात्र ही सेवा देत असताना कोरोनाची लागण झालेल्या ५२ बेस्ट कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळं मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे, तर बेस्ट उपक्रमामध्ये कोरोनामुक्त होण्याचं प्रमाण ९५ टक्क्यांपर्यंत पोहोचलं आहे.

बेस्टमधील एकूण २ हजार ८३५ पैकी २ हजार ६९० कर्मचारी कोरोनामुक्त झाले असून यामधील ५२ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचं समोर येत आहे. उर्वरित रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू असून, काही कर्मचारी विलगीकरणात आहेत. अत्यावश्यक सेवेसाठी कोरोनाकाळात बेस्टच्या परिवहन सेवेबरोबरच वीज विभागातील कर्मचारी कार्यरत होते. त्यामुळं परिवहन सेवेतील जवळपास ६० ते ७० टक्के चालक व वाहकांना कर्तव्यावर असताना कोरोनाची लागण झाली आहे.

परिवहन सेवा, बेस्टमधील अभियंता विभाग, सुरक्षारक्षक आणि अन्य विभागातील कर्मचारी आहेत. सध्याच्या घडीला बेस्टमधील ५० पैकी ४० कर्मचाऱ्यांना सौम्य व अतिसौम्य लक्षणं आहेत, तर यातील उर्वरित १० जण हे ऑक्सिजनवर आहेत. याशिवाय ४८ कर्मचारी संशयित असल्यानं त्यांना विलगीकरणात ठेवण्यता आलं आहे.

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हीच संख्या ३७ होती. ही संख्या जास्त असल्याचा दावा बेस्टमधील संघटनांनी केला आहे, परंतु बेस्ट उपक्रमाकडून अद्याप ५२ मृत्यू झाल्याचं स्पष्ट केलं आहे. उपक्रमात कोरोना झालेल्या कर्मचाऱ्यांनी १ ते ३ महिनेही उपचार घेऊन त्यावर मात केल्याचीही नोंद आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा