Advertisement

कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी 'यांची' होणार कोरोना चाचणी

दिवाळीनिमित्त खरेदीसाठी झालेल्या गर्दीनंतर मुंबईत कोरोना संसर्ग पुन्हा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.

कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी 'यांची' होणार कोरोना चाचणी
SHARES

मुंबईत कोरोना नियंत्रणात असला तरी दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळं खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेनं नागिरकांच्या चाचण्या घेण्याचा निर्णय घेतला. त्याचप्रमाणं आता ज्यांच्या माध्यमातून कोरोना व्हायरस पसरण्याची शक्यता आहे. अशा कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. त्यानुसार, झोमॅटो, स्विगीच्या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.

दादर, माहीम, धारावी आणि आसपासच्या परिसरात खाद्यपदार्थ घरपोच करणाऱ्या स्विगी आणि झोमॅटो कंपनीतील कर्मचाऱ्यांबरोबरच ब्युटी पार्लरच्या कर्मचाऱ्यांची महापालिकेतर्फे कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. दिवाळीनिमित्त खरेदीसाठी झालेल्या गर्दीनंतर मुंबईत कोरोना संसर्ग पुन्हा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. लहान-मोठ्या बाजारपेठा, फेरीवाले आदींकडे खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळं दादर आणि आसपासच्या परिसरातील बाजारपेठा, तसंच रस्त्यांवर बसणाऱ्या फेरीवाल्यांच्या कोरोना चाचण्या करण्याचा केल्या जात आहेत.

बहुतांश नागरिक उपाहारगृहात जाऊन खाद्यपदार्थ खाण्याऐवजी ते स्विगी किंवा झोमॅटोच्या कर्मचाऱ्यांकरवी घरीच मागविणं पसंत करीत आहेत. घरोघरी फिरणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून कोरोनाच्या संसर्गाचा प्रसार होऊ शकतो. ही बाब लक्षात घेत या कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचण्या करण्यास मंगळवारपासून सुरुवात करण्यात आली.

लॉकडाऊननंतर काही अटीसापेक्ष सौंदर्य प्रसाधनगृहं सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. तिथं मोठ्या संख्येनं महिला जात असतात. ही बाब लक्षात घेऊन तेथील कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात येणार आहे. महापालिकेच्या 'जी-उत्तर' विभागानं दादर, माहीम, धारावीत साफसफाईचं काम करणाऱ्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील २,५२८ सफाई कामगारांची कोरोना चाचणी केली असून त्यांच्यापैकी ३४ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचं आढळलं.

पोलीस ठाणे, सागरी पोलीस ठाणे, बाजारपेठा, औद्योगिक ठिकाणे इथं आयोजित केलेल्या शिबिरांमध्ये १,१७२ व्यक्तींची चाचणी करण्यात आली असून, त्यापैकी १४ जण कोरोनाबाधित असल्याचं निदर्शनास आलं, तर मोबाइल व्हॅनच्या माध्यमातून ३८६ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या. चाचणीदरम्यान तिघांना बाधा झाल्याचं आढळलं. ४०८६ पैकी ५१ बाधित रुग्ण सापडलं असून, काही जणांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आलं, तर काही जणांना गृहविलगीकरणात राहण्याची परवानगी दिल्याची माहिती समोर येत आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा