पुन्हा अफवांना उधाण

 Sewri
पुन्हा अफवांना उधाण
पुन्हा अफवांना उधाण
पुन्हा अफवांना उधाण
पुन्हा अफवांना उधाण
See all

शिवडी - सध्या सर्वत्र दहशतवाद्यांचे सावट असून या संबंधित 5 स्केच व्हायरल झाले आहेत. त्यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे नागरिकांना जागरूक राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गुरूवारी याच पार्श्वभूमीवर पोलिसांना शिवडी परिसरात संशयित इसम फिरत असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शिवडी नाका इथल्या परिसराची पाहणी केली. तसेच आशिर्वाद इमारतीत कोम्बिंग ऑपरेशन केले. मात्र यातून काहीही निष्पन्न झाले नाही. मात्र ही माहिती सोशल मीडियावर लीक झाल्यामुळे अफवांना ऊत आले होते. त्यामुळे बघ्यांची एकच गर्दी येथे दिसून आली. पण अशा प्रकारची सवेंदनशील माहिती मिळताच कशा प्रकारे तात्काळ कार्य करावे यादृष्टीने आर. ए. किडवाई पोलिसांच्यावतीने मॉकड्रिल करण्यात आले.

Loading Comments