पाल्याच्या आॅनलाईन शिक्षणा दरम्यान घ्या काळजी, अन्यथा तुमची होऊ शकते फसवणूक

सायबर चोरटे अल्पवयीन मुलांच्या बालबुद्धीचा फायदा घेऊन तुम्हला अडचणीत आणू शकतात किंवा तुमची फसवणूक करू शकतात.

पाल्याच्या आॅनलाईन शिक्षणा दरम्यान घ्या काळजी, अन्यथा तुमची होऊ शकते फसवणूक
SHARES

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अशातच मुलांचा शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून राज्य शासनाने मुलांसाठी आॅनलाईन वर्ग घेण्याची सूचना दिली.  मात्र मुले सध्या शिक्षणासोबत फावल्या वेळात ऑनलाईन सर्फिग करत असतात. अशा वेळी पालकांनी मुलांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचा सल्ला महाराष्ट्र सायबर विभागाने दिला आहे. कारण काही सायबर चोरटे अल्पवयीन मुलांच्या बालबुद्धीचा फायदा घेऊन तुम्हला अडचणीत आणू शकतात किंवा तुमची फसवणूक करू शकतात.

हेही वाचाः- Exclusive डी कंपनीतल्या ‘या’ कुख्यात डॅानला झाली कोरोनाची लागण

राज्या लाॅकडाऊनमुळे शाळा, महाविद्यालय बंद असून मुलांचे शिक्षण हे सध्या आॅनलाईन पद्धतीने सुरू करण्याच आदेश शासनाने दिले आहेत. त्यामुळे अल्पवयीन मुलांचा इंटरनेटवरील वापर सध्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र मुलांचा हा अभ्यास घेताना. त्यांच्या प्रत्येक हालचालींवर पालकांनी बारीक नजर ठेवण्याच आवाहन सायबर विभागाने केले आहे. विशेष करून ७ ते १८ वयोगटातील मुलांच्या पालकांनी  पाल्य ऑनलाईन सर्फिंग करताना आपण त्याच्यावर विशेष लक्ष ठेवावे, अशी विनंती सायबर विभागाकडून करण्यात आली आहे. जर ते कोणाशी ऑनलाईन चॅट करत असतील तर समोरची व्यक्ती कोण आहे याची  माहिती करून घ्या ,तुमच्या फोन किंवा घरातील लॅपटॉप व संगणकाद्वारे कोणत्या संकेतस्थळावर क्लीक करत आहेत,किंवा  काय वेबसाईटवर जात आहेत यावर लक्ष ठेवा. आपल्या पाल्यास कोणी ऑनलाईन धमकावत तर नाही याची खात्री करा.  तसेच आपण आपले डेबिट किंवा क्रेडिट कार्ड्स व त्यांचे पिन क्रमांक आपल्या पाल्यास देण्याचे टाळावे ,तसेच काही ऑनलाईन खरेदी करताना तुम्ही त्यांच्या  बाजूला बसून सर्व व्यवहार तपासून बघा .  आपले पाल्य हे कोणत्यातरी ऑनलाईन फसणक किंवा ऑनलाईन रॅकेट मध्ये अडकलेत किंवा चाईल्ड पोर्नोग्राफीचे शिकार बनलेत तर घाबरून न जाता आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये त्याबाबत तक्रारीची नोंद करा व त्याची माहिती सायबर पोलिसांच्या संकेतस्थळावरही द्यावी, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागामार्फत देण्यात आली आहे.


लाॅकडाऊन दरम्यान सायबर विभागाने केलेली कारवाई

राज्यात सायबर संदर्भात ६०१  गुन्हे दाखल झाले असून २९० व्यक्तींना अटक केली आहे.अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागातर्फे देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये एकूण ६०१  गुन्ह्यांची (त्यात ५७ अदखलपात्र गुन्हे आहेत) नोंद करण्यात आली आहे. राज्यात आक्षेपार्ह पोस्ट व्हॉटसअॅपवर पाठवल्याप्रकरणी २१९ गुन्हे दाखल झाले आहेत. तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी २६२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, टिकटॉक विडिओ शेअर प्रकरणी २८ गुन्हे दाखल झाले आहेत व ट्विटर द्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी १९ गुन्हे दाखल झाले आहेत, इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ५ गुन्हे दाखल झाले आहेत .तर अन्य सोशल मीडियाचा ( युट्युब, चित्रफीत ) गैरवापर केल्या प्रकरणी ६८ गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आतापर्यंत २९९ आरोपींना अटक केली आहे. तर यापैकी १३६ आक्षेपार्ह पोस्ट्स काढून टाकण्यात आल्या आहेत.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा