नेटफ्लिक्स चाहत्यांनो रहा सावधान, महाराष्ट्र सायबर पोलिसांनी केलं ‘हे’ आवाहन

नेटफ्लिक्सचे बिल न भरल्यास २४ तासात सदस्यता रद्द करण्याची धमकी देत ही फसवणूक केली जात असल्याचे सायबर पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

नेटफ्लिक्स चाहत्यांनो रहा सावधान, महाराष्ट्र सायबर पोलिसांनी केलं ‘हे’ आवाहन
SHARES

राज्यात लॅाकडाऊनमुळे सोशल मिडियासह इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याच संधीचा फायदा घेत सायबर भामटे लोकांची आर्थिक फसवणूक करण्यासाठी नवनवीन शक्कल लढवतं आहेत. सध्या या चोरांनी नेटफ्लिक्स आणि इतर वेब साईट वापरणाऱ्यांना लक्ष केलं आहे. नेटफ्लिक्सचे बिल न भरल्यास २४ तासात सदस्यता रद्द करण्याची धमकी देत ही फसवणूक केली जात असल्याचे सायबर पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचाः- गुड न्यूज! मुंबईतील सर्व दुकाने आता एकाचवेळी सुरू राहणार

लॉकडाउनमुळे सध्या थिएटर बंद असल्याने काही निर्माते आता आपले चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करीत आहेत. त्यामुळे या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पूर्वीपेक्षा सध्या जास्त प्रमाणात फिल्म्स प्रदर्शित होत आहेत. यामध्ये इतर प्लॅटफॉर्म्सच्या तुलनेत नेटफ्लिक्स आघाडीवर असून त्यांनी बरेच वेगळ्या स्वरुपाचे वेब शोज प्रदर्शित केले आहेत. या संधीचा फायदा घेऊन सायबर चोरट्यांनी नागरिकांना एक ईमेल पाठवून बिल २४ तासात भरण्याचे आवाहन केले जात आहे. बिल न भरल्यास २४ तासात सदस्यता रद्द करण्यात येईल. अशी माहीती दिली जाते. त्यानुसार नागरिक ईमेल खाली दिलेल्या लिंकवर पैसे भरण्यासाठी जातात. एकदा वापरकर्त्याने लिंकवर क्लिक केले की, वापरकर्त्याला नेटफ्लिक्सच्या फेक वेबसाइटवर नेले जाते. वापरकर्त्यांना त्यांचे नेटफ्लिक्स लॉगिन प्रमाणपत्रे, बिलिंग पत्ता आणि क्रेडिट कार्ड तपशील प्रविष्ट करण्यास सांगितले जाते . एकदा  पूर्ण माहिती प्रविष्ट केल्यावर वापरकर्त्याला नेटफ्लिक्सच्या ओरिजिनल  वेबसाइटवर नेले जाते आणि या  प्रकारे फिशिंगचा प्रवाह पूर्ण होतो . अशा प्रकारे वापरकर्त्यांच्या नकळत त्यांच्या कार्डची माहिती घेतली जाते  आणि फिशिंग घोटाळ्याला बळी पाडले जाते. सेन्डर्स चा ई-मेल आय डी पाहता (netfiix@csupport.co), हे स्पष्ट होते की.सायबर क्रिमिनल्सनि  तो कायदेशीर(ओरिजिनल) दिसावा म्हणून पुरेपुर प्रयत्न केला आहे, ज्यामुळे नेटफ्लिक्स ग्राहक फिशिंग घोटाळ्याला बळी पडतील.

हेही वाचाः- दिलासादायक! मुंबईतील कंटेन्मेंट झोन्स २२ टक्क्यांनी घटले

हा सर्व प्रकार लक्षात घेता महाराष्ट्र सायबर तर्फे असे आवाहन करण्यात येते की, फिशर्सना ओरिजिनल कंपनीचा लोगो वापरकर्त्याना फसवण्यासाठी कशा प्रकारे वापरायचे हे चांगल्या प्रकारे माहिती आहे,  म्हणून आपण क्लिक करण्यापूर्वी विचार करावा. आपणास प्राप्त झालेला  ईमेल आणि त्याचा ईमेल आयडी काळजीपूर्वक तपासा सगळ्याच वेबसाईट ओरिजिनल नसतात त्यामुळे सगळ्याच वेबसाईटवर विश्वास ठेवू नये. कोणत्याही लिंकवर  क्लिक करू नका किंवा संशयास्पद ईमेलमधील अँट्यचमेंट  डाउनलोड करू नका. आपली वैयक्तिक महिती किंवा बँक, के्डिट/डेबिट कार्ड आणि ओटीपी इ. तपशील कोणाशीही शेअर करु नका. अशा प्रकारच्या सापळ्यात अडकण्यापूर्वी ओरिजिनल नेटफ्लिक्स वेबसाइट वर जा आणि आपले बिल पेमेन्ट इत्यादी तपशील पडताळून बघा असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभाग, विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे मार्फत करण्यात आले आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा