Exclusive डी कंपनीतल्या ‘या’ कुख्यात डॅानला झाली कोरोनाची लागण

त्याच्यावर खंडणी सारख्या ८० हून अधिक तक्रारी असून मुंबईत २५ गुन्ह्यांची नोंद आहे. एकेकाळी हा गुंड मोस्ट वाॅन्टेड दाऊद इब्राहिमचा खास माणूस होता.

Exclusive डी कंपनीतल्या ‘या’ कुख्यात डॅानला झाली कोरोनाची लागण
SHARES

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा डावा हात म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुख्यात डाॅन एजाज लकडावालाला जेल मध्येकोरोनाची लागण झाल्याची धक्कादायकमाहिती समोर आली आहे. कित्येक वर्षानंतर एजाजला पकडण्यात मुंबई पोलिसांना यश आले. एजाजवर ८० गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. सध्या मुलीला भारतातून पळून जाण्यासाठी बनावट पासपोर्ट दिल्याप्रकऱणी खंडणी विरोधी पथकाने त्याचा ताबा घेतला होता. त्यावेळी त्याची तपासणी केली असता. एजाजचा कोरोनाचा अहवाल हा पाॅझिटिव्ह आला. त्यानंतर एजाजला उपचारासाठी जी.टी रुग्णालायत दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  

हेही वाचाः- 'आम्ही आणू बाप्पा तुमच्या घरी', मनसेचा अनोखा उपक्रम

एजाज विरोधात हत्या, खंडणी सारख्या ८० हून अधिक तक्रारी असून मुंबईत २५ गुन्ह्यांची नोंद आहे. जोगेश्वरीच्या अमृतनगरमध्ये राहणाऱ्या एजाजवर तो अल्पवयीन असतानाच पहिला गुन्हा नोंदवण्यात आला होता. शाळेत असताना त्याने त्याच्या शिक्षिकेला मारहाण केली होती. त्यानंतर एजाज परिसरात छोट्या मोठ्या चोरी आणि मारामाऱ्या करू लागला. त्यावेळीच  'डी गॅग'ची नजर त्याच्यावर पडली. पुढे राजनच्या सांगण्यावरून तो सुपाऱ्या घेऊ लागला. पायधुनी पोलिस ठाण्यात एजाजवर २ हत्येच्या गुन्ह्यांची नोंद आहे. याच गुन्ह्यात तो अटकेत असताना. १९९७ मध्ये त्याला नाशिक जेलमध्ये ठेवण्यात आले होते. वैद्यकिय तपासणीसाठी त्याला मुंबईच्या जे.जे रुग्णालयात आणले असताना पोलिसांना हुलकावणी देऊन त्याने पळ काढला होता. त्या दिवसापासून पोलिस त्याच्या मागावर होते. त्यामुळे एका ठिकाणी स्थिर न राहता. एजाज वारंवार आपली जागा बदलायचा. वेगवेगळ्या नावाने एजाज तब्बल ७ ते ८ देशात वावरत होता.

हेही वाचाः- फिलीपाइन्स वापरणार धारावी पॅटर्न! महापालिकेने दिली ब्ल्यू प्रिंट

दरम्यान जानेवारी २०२० मध्ये एका व्यावसायिकाला खंडणीसाठी एजाजने धमकावले. त्यात त्याच्या मुलीनेही त्याला सहकार्य केल्याने निदर्शनास आल्यानंतर एजाज वारंवार मुलीच्यासंपर्कात असल्याचे पुढे आले. एजाजचा ठाव ठिकाणा काढण्यासाठी खंडणी विरोधी पथकाच्या पोलिसांनी त्याची मुलगी सोनिया हिच्यावर नजर ठेवली. खंडणीच्या त्या गुन्ह्यात मुलीला पोलिस केव्हाही अटक करू शकतात हे लक्षात आल्यानंतर एजाजने मुलीचा आणि नातवाचा बनावट पासपोर्ट बनवला. या पासपोर्टच्या आधारे मुली देश सोडणार तोच पोलिसांनी तिला पकडले. मुलीच्या मोबाइलमध्ये मिळालेल्या विविध नंबरमधून तो बिहारच्या पटना येथे लपला असल्याची माहिती २७ डिसेंबर रोजी पोलिसांना मिळाली. त्यानुसार बिहार पोलिसांच्या मदतीने मुंबई खंडणी विरोधाचे पोलिस त्याच्यावर लक्ष ठेवून होते. विशेष म्हणजे भाऊ आणि मुलीच्या अटकेनंतर ही एजाज पैशांसाठी व्यावसायिकांना धमकावतच होता. ३ जानेवारी रोजी त्याने खारमधील एका व्यावसायिकाला धमकावले. पोलिसांनी त्या नंबरचा माग काढला आणि एजाजचे लोकेशन पोलिसांना कळाले. पोलिस मागावर असल्याची माहिती मिळाल्यानंतर एजाज पून्हा भारताबाहेर पळ काढण्याच्या प्रयत्नात असतानात मुंबई पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या होत्या.

हेही वाचाः- संजय दत्त कोकिलाबेन रुग्णालयात दाखल, भावूक होऊन दिली माहिती

त्यानंतर कोरोना संकट सुरू झाल्यामुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे पोलिसांनीही चौकशीसाठी लकडवालाचा ताबा घेतला नव्हता. अखेर ७ ऑगस्टला गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधीत पथकाने त्याला ताबा पुन्हा ताबा घेतला होता. मुलीच्या बनावट पारपत्राप्रकरणी हा ताबा घेण्यात आला. पण आता गँगस्टर लकडावालाला कोरोनाची लागण झाली आहे. अटकेनंतर वैद्यकीय चाचणी दरम्यान ही बाब पुढे आली. त्यानंतर त्याला तात्काळ जीटी रुग्णालयातील विशेष कक्षात दाखल करण्यात आले आहे. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याची स्थिती स्थीर आहे. कोरोनाची कोणतीही गंभीर लक्षण नाहीत. पण खबरदारी म्हणून त्याला रुग्णालयात दाखल करून त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्याला कोरोनाची लागण नेमकी कशामुळे झाली,हे स्पष्ट नाही. यापूर्वी यापूर्वी लकडावाला कारागृहात असताना तेथे अनेक कैद्यांना कोरोनाची लागण झाली होती.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा