15 वर्षांच्या मुलाचा टॅक्सीचालकाकडून छळ

 Khar
15 वर्षांच्या मुलाचा टॅक्सीचालकाकडून छळ

खार - टॅक्सीचालकानं 15 वर्षाच्या मुलाचा शाररिक छळ केल्यानं मुंबईतल्या खार परिसरात एकच खळबळ उडालीय. या प्रकरणी खार पोलिसांनी टॅक्सीचालक नुरूल हसन गुल हसन खान (30) ला अटक केली असून त्याला 29 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.

खार परिसरात राहाणारा 15 वर्षाचा मुलगा रविवारी माहिम येथे क्लासला गेला होता. रात्रीच्या सुमारास तो आपल्या मित्राकडे अभ्यासाला जाणार होता, माहिमच्या हिंदुजा हॉस्पिटलवरून त्याने टॅक्सी पकडली आणि खारच्या दिशेनं निघाला. मात्र टॅक्सीचालक नुरूल हसनच्या मनात काही वेगळंच होतं. त्याने टॅक्सी खारच्या 16 व्या रस्त्यावर वळवली आणि तिथे कुणीही नसल्याचा फायदा घेऊन 15 वर्षांच्या मुलावर शारीरिक अत्याचार केल्यानं मुलगा धास्तावला होता. मात्र उतरताना पीडित मुलानं टॅक्सीचा नंबर लिहून घेत घडलेला प्रकार घरच्यांना सांगितला. त्यानंतर कुटुंबियांनी यासंदर्भात खार पोलिसांंकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी अत्यंत अल्पावधीत आरोपी नुरुल हसनच्या मुसक्या आवळल्या.

नुरुलला पोलिसांनी पोक्सो कलमांतर्गत अटक केली असून मंगळवारी त्याला सत्र न्यायालयात हजर केले असता कोर्टानं त्याला 29 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती खार पोलिसांनी दिली.

Loading Comments