कचरा उचलणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण


कचरा उचलणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण
SHARES

कुंभारवाडा - कचरा उचलणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांना एका टॅक्सी चालकाने मारहाण केल्याची घटना गिरगावमधील कुंभारवाड्यात घडली. ही घटना रविवारी रात्री 1 च्या सुमारास घडली. सबूत शेख असं या टॅक्सी चालकाचे नाव असून, समशेर कंपाउंड, दुसरी कुपर गल्ली, चोरबाजार येथे घनकचरा उचलण्यासाठी गेलेल्या अशोक मेवाड आणि राजेश बोराजी या पालिका कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली. सबूत शेख हा टॅक्सीचा दरवाजा उघडा ठेवून झोपला होता त्यावेळी या पालिका कर्मचाऱ्यांनी त्याला दरवाजा बंद करण्यास सांगितले. त्यावेळी संतापलेल्या टॅक्सी चालकाने त्यांना बेदम मारहाण केली. विशेष म्हणजे सलग दोन आठवडे हे कर्मचारी विविध भागांत घनकचरा उचलण्यासाठी गेले असता त्यांना रस्त्यावर राहणाऱ्या नागरिकांकडून मारहाण केली जाते. याबाबत या कर्मचाऱ्यांनी जे.जे. पोलीस ठाण्यात आणि पिकेट रोड पोलीस ठाण्यात तक्रार करूनही त्याची दखल घेतली गेली नसल्याचे सांगत आमच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उभा राहिल्याची प्रतिक्रिया घनकचरा विभागाचे सहाय्यक अभियंता शंकर मुंढे यांनी दिली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा