शेजाऱ्यांच्या ३ अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे


शेजाऱ्यांच्या ३ अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे
SHARES

मुंबईच्या कांदीवली परिसरात अंगणात खेळत असलेल्या तीन मुलींना घरात नेहून त्यांच्य़ाशी अश्लील चाळे करणाऱ्या नराधमास अटक केली आहे. मोहम्मद आरजू मोहम्मद ताहीर शेख (४८) असे या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे कांदिवली पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.  

हेही वाचाः- 26/11 Attack : सागरी ‘रडार’ यंत्रणा दुरुस्तीविना अडगळीत ! देशातील ३८ ठिकाणी रडार यंत्रणा तैनात

सांताक्रूझच्या प्रभात काॅलनी परिसरात आरोपी मोहम्मद आरजू मोहम्मद ताहीर शेख हा टेलरचा व्यवसाय करतो. मोहम्मद आरजू मोहम्मद ताहीर शेख याचा भाचा हा कांदिवलीच्या लालजीपाडा परिसरात भाड्याने खोली घेऊन राहतो. त्याची खोली वनप्लस वन असल्याने तो वरच्या खोलीत आपल्या कुटुंबियांसोबत राहतो. खालची खोली रिकामी असल्यामुळे आरोपी अधून मधून त्या ठिकाणी रहायला यायचा. २५ नोव्हेंबर रोजी आरोपी कांदिवलीच्या खोलीवर आला असताना. तीन अल्पवयीन मुली या घरासमोर खेळत होत्या, त्यावेळी शेख यांच्या घरात त्या गेल्यानंतर शेखने त्याच्याशी अश्लील चाळे केले. यातील एका मुलीने आपल्या कुटुंबियांना ही माहिती दिल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.

या प्रकरणी कांदिवली पोलिस ठाण्यात मोहम्मद आरजू मोहम्मद ताहीर शेख विरोधात तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी ३५४ भा.द.विसह, ९(एम)सह, १०,१२ पोस्को अधिनियम कायद्यानुसार गुन्हा नोंदवत त्याला अटक केली आहे. या प्रकरणी अधिक तपास कांदिवली पोलिस करत असून या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळलेली आहे.   

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा