13 वर्षीय विद्यार्थिनीचा शाळेतील शिक्षकाकडूनच विनयभंग

POCSO अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

13 वर्षीय विद्यार्थिनीचा शाळेतील शिक्षकाकडूनच विनयभंग
SHARES
कांदिवली (kandivali) इथल्या एका शाळेतील 13 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीने शाळेच्या मुख्याध्यापकांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर मुख्याध्यापकांनी पीडित मुलीच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती देत कांदिवली पोलिसांत तक्रार दाखल केली.

याप्रकरणी पोलिसांनी मुलांवर लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यानुसार (pocso) गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 29 जुलै ते 30 जुलै दरम्यान घडली होती. मात्र पीडितेने भीतीपोटी हा प्रकार कोणालाही सांगितला नाही.

शाळेच्या मुख्याध्यापिकेने पीडित (victim) मुलीला विश्वासात घेऊन तिच्याशी चर्चा केली. त्यावेळी आरोपी शिक्षक आपला विनयभंग करत असल्याचे विद्यार्थिनीने सांगितले. ही घटना गंभीर असल्याचे मुख्याध्यापिकेच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने पीडित मुलीच्या पालकांना शाळेत बोलावून घटनेची माहिती दिली. 

मुलीच्या पालकांना धक्का बसला. मुलांच्या सुरक्षेची जबाबदारी शाळेची असल्याने त्यांनी याप्रकरणी कारवाई करावी, असे त्यांनी मुख्याध्यापकांना सांगितले. त्यानंतर मुख्याध्यापकांनी याप्रकरणी कांदिवली पोलिसांत तक्रार दाखल केली.

त्यानुसार, पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 74 (विनयभंग), 78 (महिलेचा वारंवार संपर्क किंवा पाठलाग करणे), 79 (अश्लील हावभाव किंवा असभ्य संवाद) आणि पॉक्सो कायद्याच्या कलम 8 आणि 12 अंतर्गत गुन्हा नोंदवला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.



हेही वाचा

महापालिका 263 गोठे मुंबईहून पालघरला स्थलांतरित करणार

20 प्रमुख रेल्वे स्थानकांना AEDs यंत्रणा मिळणार

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा