अल्पवयीन मुलीचे अपहरण

 Chembur
अल्पवयीन मुलीचे अपहरण

चेंबूरच्या खारदेव नगर परिसरातून शुक्रवारी एक 17 वर्षीय मुलगी घरातून अचानक गायब झाली आहे. अंकिता (नाव बदललेले आहे) नावाची ही तरूणी खारदेव नगर परिसरात आई-वडील आणि भावासह राहत होती. शुक्रवारी सकाळी ती बाजारात जाण्यासाठी घराबाहेर गेली. मात्र पुन्हा घरी न परतल्याने तिच्या नातेवाईकांनी सर्व ठिकाणी शोध घेतला.

अनेक ठिकाणी शोध घोऊनही ती मिळून न आल्याने त्यांनी सायंकाळी गोवंडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मुलगी अल्पवयीन असल्याने पोलीसांनी तत्काळ अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

Loading Comments