गुजरातमधील दलित नेत्याची हत्या करण्यास मुंबईतून अटक

या हत्याकांडा विरोधात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले, दलित नेता जिग्नेश मेव्हाणी यानेही ट्विट करून या घटनेचा निषेध नोंदवला.

गुजरातमधील दलित नेत्याची हत्या करण्यास मुंबईतून अटक
SHARES

गुजरातमध्ये दलित चळवळीचे नेते  अँड देवजीलाल माहेश्वरी यांची दिवसा ढवळ्या हत्या करणाऱ्या आरोपीस गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे. भारत जयंतीलाल रावळ उर्फ महाराज असे या आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या आरोपीचा ताबा गुजरात पोलिसांना दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अनेकदा सुरक्षित आणि सर्वच क्षेत्रात अग्रेसर म्हणून गुजरात राज्याची स्तुती करत असतात. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात राज्यात  एका दलित नेत्याची दिवसा ढवळ्या हत्या होत असल्याने गुजरातमध्ये कायदा व सुव्यवस्थेचे कसे तीन तेरा वाजलेले आहेत. हे दिसून येते, गुजरातमध्ये प्रशासनाच्या आणि दलितांच्या प्रश्नांना न्या मिळवून देण्यासाठी देवजीलाल माहेश्वरी हे  कायमच आवाज उठवतात. असे असताना दोन दिवसांपूर्वी पूर्व वैमन्यसातून भारत जयंतीलाल रावळ याने त्यांची दिवसा ढवळ्या हत्या केली. हत्येनंतर रावळ याने मुंबईत पळ काढला. या हत्याकांडा विरोधात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले, दलित नेता जिग्नेश मेव्हाणी यानेही ट्विट करून या घटनेचा निषेध नोंदवला.

हेही वाचाः- उपमुख्यमंत्र्यांची 'मोठी' घोषणा, राज्यात कृषी सुधारणा व कामगार विधेयक लागू करणार नाही

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गुजरात  पोलिसांनी मुंबई पोलिसांना सतर्क करत मदत मागितली. गुन्ह्यांचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. गुन्हे शाखा ९ च्या पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार भारत हा मालाड परिसरात येणार होता. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. सध्या भारतचा ताबा हा गुजरात पोलिसांना देण्यात आलेला आहे.

संबंधित विषय