उड्डाणपुलावर दुचाकीचा अपघात

दहिसर - एका दुचाकीचा तोल जाऊन अपघात झाल्याची घटना दहिसरच्या सुधीर फडके उड्डाणपुलावर घडली. यामध्ये दोन तरुण गंभीर जखमी झाले असून उपचारासाठी त्यांना शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार ते दोघे तरुण गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास एकाच दुचाकीवरून दहिसर (प.) हाय-वेच्या दिशेने जात होते. तेव्हा त्यांच्याचसोबत असलेल्या एका दुसऱ्या दुचाकीस्वाराबरोबर ते बोलत होते. त्यावेळी दोन दुचाकींपैकी एका दुचाकीचा तोल गेल्याने ती डिव्हायडरवर चढली आणि एका कारला धडकल्याने दुचाकीचे दोन तुकडे झाले. मिळालेल्या माहितीनुसार ती कार भाजपाच्या मिरा-भाईंदरचे जिल्हा उपाध्यक्ष ललित कुमार व्यास यांची होती. त्यामध्ये त्यांची मुलगी प्रवास करत होती.

Loading Comments