ठाणे महापालिकेने केले १५ लेडीज बार सील

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेवून नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करून नये, मास्क वापरण्यासोबत सोशल डिस्टन्सिंग पाळणं बंधनकारक आहे.

ठाणे महापालिकेने केले १५ लेडीज बार सील
SHARES

कोरोना नियमांचे उल्लंघन करणारे १५ लेडीज बार ठाणे महापालिकेने सील केले आहेत. ठाणे महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. 

सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायजर वापर तसेच इतर साथरोग नियंत्रण अधिनियमांचे उल्लंघन केल्याने या बारवर पालिकेने कारवाई केली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेवून नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करून नये, मास्क वापरण्यासोबत सोशल डिस्टन्सिंग पाळणं बंधनकारक आहे. 

 बार अँण्ड रेस्टॉरंट, लेडिज बारला कोरोना नियमांचं पालन करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. सोमवार ते शुक्रवार 50 टक्के बैठक क्षमतेने सायंकाळी 4 वाजेपर्यंत बार, रेस्टॉरंट सुरू ठेवण्याचे तसंच सायंकाळी 4 नंतर व शनिवार आणि रविवार फक्त पार्सल सुविधा व होम डिलिव्हरी सेवा सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन केलेले पंधरा बार महापालिकेने सील केले आहेत.

ठाण्यातील तलावपाळी येथील आम्रपाली बार, तीन पेट्रोल पंप येथील अ‍ॅन्टीक पॅलेस बार, उपवन येथील नटराज बार, सिनेवंडर येथील आयकॉन बार, कापुरबावडी येथील स्वागत बार, नळपाडा येथील नक्षत्र बार, पोखरण रस्ता क्रमांक दोन येथील के-नाईट बार, ओवळा नाका येथील स्टरलिंग बार, मॉडेला नाका येथील अ‍ॅन्जेल बार, उपवन येथील सुर संगम बार, भाईंदरपाडा येथील खुशी आणि मैफील बार, वागळे इस्टेटमधील सिझर पार्क बार, नौपाड्यातील मनिष बार आणि कापूरबावडी येथील सनसिटी बार या बारवर कारवाई करण्यात आली आहे. 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा