अभिनेता-अभिनेत्रींना ड्रग्ज पुरवणाऱ्याच्या मुसक्या NCB ने आवळल्या

अभिनेता अजय देवघन याच्या वन्स अपॉन ए टाईम इन मुंबई या चित्रपटातील सुल्ताम मिर्झा या भूमिकेवरून प्रभावीत होऊन त्याने हे नाव वापरण्यास सुरूवात केली

अभिनेता-अभिनेत्रींना ड्रग्ज पुरवणाऱ्याच्या मुसक्या NCB ने आवळल्या
SHARES

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात ड्रग्ज कनेक्शन पुढे आल्यानंतर NCB ने बाँलीवूडमध्ये कलाकारांना ड्रग्जची तस्करी करणाऱ्यांची धरपकड सुरू केली. या प्रकऱणात प्रसिद्ध अभिनेत्रींची देखील काही दिवसांपूर्वी NCBने चौकशी केली होती. या गुन्ह्यात आता NCBने  कलाकारांना ड्रग्स पुरवणा-या एका संशयिताला NCB ने अंधेरीतून अटक केली आहे. त्यांच्याकडून तीन प्रकारचे ड्रग्स व रोख रक्कम जप्त करण्यात आल्याची माहिती एका अधिका-याने दिली.

हेही वाचाः- मुंबई आणि नवी मुंबईतील खारफुटीवर पतंग किटकांचा हल्ला

अंधेरीच्या आझादनगर परिसरात अब्दुल वाहीद ऊर्फ सुल्तान मिर्झा हा बाॅलीवूडमधील कलाकारांना ड्रग्ज पुरवण्याचे काम करतो.  त्याला एनसीबीच्या अधिका-यांनी अटक केली. त्याच्या इनोव्हा कारमधून ७५० ग्रॅम गांजा,७५ ग्रॅम चरस, तीन ग्रॅम मेफेड्रॉन(एमडी) जप्त करण्यात आली आहे. याशिवाय एक लाख ७५ हजार रुपयांची रोख रक्कमही त्याच्याकडून जप्त करण्यात आली आहे. वर्सोवा, लोखंडवाला व यारी रोड परिसरात राहणा-या काही टीव्ही कलाकारांना तो अंमली पदार्थ पुरवत असल्याची माहिती त्यांच्या चौकशीतन उघड झाली आहे. वाहिदशी संबधीत काही लिंक हाती लागल्या असून त्या व्यक्तींची लवकरच चौकशी करण्या येणार आहे.

हेही वाचाः- आता अ‍ॅमेझॉनवरुन बुक करता येणार गॅस सिलेंडर

वाहिद ड्रग्सच्या काळा दुनियेत सुल्तान मिर्झा नावाने प्रसिद्ध आहे. याच्या नावात देखील एक गंमत आहे. अभिनेता अजय देवघन याच्या वन्स अपॉन ए टाईम इन मुंबई या चित्रपटातील सुल्ताम मिर्झा या भूमिकेवरून प्रभावीत होऊन त्याने हे नाव वापरण्यास सुरूवात केली. मात्र वस्तुस्थितीत देखील चित्रपटात ज्या पद्धतीने  अभिनेता चुकीच्या मार्गाने पैसे कमवत होता त्याच पद्धतीने अब्दुल देखील स्वत: खिसे भरत होता. त्याच्या मोबाईलची पडताळणी सध्या एनसीबी करत असून त्यावरून त्याच्या ग्राहकांची काही माहिती एनसीबीच्या हाती लागली आहे. अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्या अंतर्गत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ अधिका-याने दिली.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा