महाराष्ट्रातील दहा पोलिसांना उत्कृष्ठ शोध पुरस्कार

देशभरातील एकूण १२१ क्लिष्ठ आणि गुंतागुंतीचे गुन्हे सोडवणाऱ्या पोलिसांना या पुरस्काराने गौरवण्यात येतं.

महाराष्ट्रातील दहा पोलिसांना उत्कृष्ठ शोध पुरस्कार
SHARES

केंद्रीय गृहमंत्रालयाने पोलिसांना दिल्या जाणाऱ्या उत्कृष्ठ शोध पुरस्कारांची घोषणा केली आहे.  देशभरातील एकूण १२१ क्लिष्ठ आणि गुंतागुंतीचे गुन्हे सोडवणाऱ्या पोलिसांना या पुरस्काराने गौरवण्यात येतं. त्यात महाराष्ट्रातील दहा अधिकार्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

हेही वाचाः- मुंबई महापालिकेने अभय योजनेची मुदत वाढवली

देशातल्या अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद ही केंद्रीय गृहखात्याकडून वेळोवेळी घेतली जाते. अनेक क्लिष्ठ गुन्हे पोलिस तपास करून सोडवतात आणि नागरिकांना न्या मिळवून देतात. तर आरोपीला गजाआड करतात. अशा गुन्ह्यांत अधिकाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे, या अनुषंगाने  संबधित अधिकाऱ्यांना उत्कृष्ठ शोध पुरस्कार देऊन गृहमंत्रालय मागील अनेक वर्षापासून करत आले आहे. यंदाही या पुरस्काराची यादी गृहखात्याने जारी केली असून त्यात महाराष्ट्रातील १० गुन्ह्यांचा समावेश होता. हे दहाही गुन्हे उत्कृष्ठ रित्या संभाळून  आरोपींना गजाआड टाकणाऱ्या महाराष्ट्र पोलिस दलातील अधिक्षक ज्योती क्षिरसागर, एसीपी शिवाजी पंडीतराव पवार, एसीपी समीर शेख, एसीपी किसन गवळी, एसडीपीओ नारायण शिरगावकर, अनिल घेरडिकर, वरिष्ठ निरीक्षक नरेंद्र हिरवे, पोलिस निरीक्षक उत्तम सोनावणे,  राजेंद्र बोकडे, कोंडीराम पोपेरे यांचा समावेश आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा