Advertisement

मुंबई महापालिकेने अभय योजनेची मुदत वाढवली

मुंबई महापालिकेच्या पाणी बिलाच्या थकबाकीवर दरमहा २ टक्के अतिरिक्त शुल्क आकारले जाते. अभय योजनेअंतर्गत २ टक्के अतिरिक्त शुल्क माफ केले जाते.

मुंबई महापालिकेने अभय योजनेची मुदत वाढवली
SHARES

मुंबई महानगरपालिकेने कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता अभय योजनेची मुदत ३१ डिसेंबर २०२० पर्यंत वाढवली आहे. सध्या कोरोना संकटामुळे अडचणीत असलेल्या मुंबईकरांना या निर्णयामुळे दिलासा मिळेल, असं मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.


मुंबई महापालिकेच्या पाणी बिलाच्या थकबाकीवर दरमहा २ टक्के अतिरिक्त शुल्क आकारले जाते. अभय योजनेअंतर्गत २ टक्के अतिरिक्त शुल्क माफ केले जाते. सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता आमदार सुनील प्रभु यांनी पालकमंत्री आदित्य ठाकरे यांना या योजनची मुदत वाढवण्याबात निवेदन दिलं होतं. त्यानंतर पालकमंत्री ठाकरे यांच्या विनंतीनुसार मुंबई महापालिकेने अभय योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. 



या योजनेची मुदत १२ ऑगस्ट रोजी संपणार होती. मुंबईकरांना आता ३१ डिसेंबर २०२० पर्यंत या योजनेचा लाभ घेता येणार आहे. मुंबईकरांना दिलासा देणाऱ्या या निर्णयाबद्दल मुंबई महापालिकेचे तसेच मुदतवाढ मिळण्यासाठी पाठपुरावा केल्याबद्दल आमदार सुनील प्रभू यांचे पालकमंत्री ठाकरे यांनी आभार मानले आहेत.



हेही वाचा -

'या' भागांमध्ये सेरो सर्वेक्षणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात

मुंबईत १ लाख रुग्णांनी केली कोरोनावर मात, ११३२ नवे रुग्ण



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा