COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
51,38,973
Recovered:
44,69,425
Deaths:
76,398
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
45,534
1,794
Maharashtra
5,90,818
37,236

खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत, मुलीने मुलाकडे मागितली १५ लाखांची खंडणी


खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत, मुलीने मुलाकडे मागितली १५ लाखांची खंडणी
SHARES

प्रेमसंबधात पडलेल्या मिठाच्या खड्याला अनेकदा मुलांनाच दोषी गृहित धरून समाजाकडून त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जातं. मात्र प्रत्येक घटनेत मुलंच दोषी असतात असं नाही.  मालवणीत एका ३४ वर्षीय तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून कालांतराने त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत, खंडणी मागणाऱ्या महिलेवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


कांदिवलीच्या चारकोप परिसरात राहणाऱ्या ३४ वर्षीय नसीम गौहर अली खानची डिसेंबर २०१८ मध्ये आरोपी सोनम वली मोहम्मद शेख (३२) हिच्याशी झाली होती. त्यावेळी सोनमने नसीमशी मैत्री करून कालांतराने त्याला  प्रपोज केला. मात्र नसीमने त्याला विरोध केला. त्यानंतर वारंवा सोनम नसीमशी जवळीकता साधून त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत होती. मात्र नसीम आपल्या निर्णयावर ठाम होता. नसीम प्रेमाच्या जाळ्यात अडकत नसल्याने सोनमने नसीमवर लग्न करण्यासाठी तगादा लावला. वारंवार नसीमला मेसेज करून सोनम त्रास देत होती.

इतकचं काय तर सोनमने नसीमला बलात्काराची खोटी तक्रार ठोकून बदनाम करण्याची धमकीही देऊ लागली. त्याच बरोबर मानसिक तणावाखाली असलेल्या नसीमकडून सोनमने खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भिती दाखवत महागड्या वस्तू, पैसे उकळले. मात्र रोजच्या त्रासाला कंटाळून नसीम सोनमला विरोध करू लागल्यानंतर या प्रकरणात कायमचा पूर्ण विराम लावण्यासाठी सोनमने नसीमला ओमसाई अजरूप जीम, गृरूकृपा स्कूल मालवणी येथे भेटायला बोलावले. त्यावेळी तिने त्याच्याजवळ १५ लाखांची मागणी केली. दिवसेंदिवस सोनमच्या पैशांची भूक वाढत असल्यामुळे नसीमने अखेर मालवणी पोलिसांची मदत घेतली. नसीमने दिलेल्या तक्रारीनुसार मालवणी पोलिसांनी सोनम विरोधात ३८४, ३८८, ३८९, ५०४, ५०६ (२) भा.द.वि कलमांतर्गत गुन्ह्यांची नोंद केली आहे. या प्रकरणी मालवणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा