पोलिसांच्या व्यथा सह-आयुक्त थेट 'व्हिडीओ कॉन्फरसिंग'द्वारे ऐकणार

पोलिसांच्या समस्यांचे गाऱ्हाणे ऐकण्यासाठी सहआयुक्तांनी 'व्हिडीओ कॉन्फरसिंग'द्वारे आज्ञांकित कक्ष सुरु केला आहे. त्याच्यामार्फत पोलिसांच्या समस्या समोरासमोर सोडवल्या जाणार आहेत.

पोलिसांच्या व्यथा सह-आयुक्त थेट 'व्हिडीओ कॉन्फरसिंग'द्वारे ऐकणार
SHARES
तीन महिने कोरोनाचा वैशाख वणवा सोसल्यानंतर या विचित्र परिस्थितीचे अनेक पोलिस शिकार झाले. राज्यातील 2 हजारहून अधिक पोलिस कोरोनाने ञस्त आहेत. त्यातील अनेकांनी कोरोनावर मात केली. माञ काहींना या लढाईत अपयश आले. कोरोनासोबतच्या या लढाईत पोलिसांच्या ही मनात अनेक समस्या आहेत, माञ आज पर्यंत त्यांना त्या व्यक्त करता येत नव्हत्या. माञ या पुढे पोलिसांच्या सर्व समस्या या ऐकल्या ही जाणार आहेत आणि शक्य तितक्या लवकर त्या सोडवल्या ही जाणार आहे. पोलिसांच्या समस्यांचे गाऱ्हाणे ऐकण्यासाठी सहआयुक्तांनी 'व्हिडीओ कॉन्फरसिंग'द्वारे आज्ञांकित कक्ष सुरु केला आहे. त्याच्यामार्फत  पोलिसांच्या समस्या समोरासमोर सोडवल्या जाणार आहेत.

 राज्यात 1510 पोलिसांना कोविड-19 ची लागण झाली आहे. त्यांच्या संपर्कातील हजारो पोलिसांना सध्या क्वारंटाइन करून ठेवले आहे. या महामारीने 30 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. अशा स्थितीत 30 जूनपर्यंत लॉकडाउन वाढला आहे. त्यातच पावसाने हजेरी लावल्याने पोलिसांची डोकेदुखी ही वाढली आहे. या ना त्या कारणाने पोलिसांच्या समस्या वाढतच असून संपण्याचे नाव घेत नव्हत्या, त्यामुळेच पोलिसांच्या या समस्या जाणून त्यावर तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठीच पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली 
 'व्हिडीओ कॉन्फरसिंग'द्वारे आज्ञांकित कक्ष सुरु 
करण्यात आले आहे. 

जे पोलिस अधिकारी-कर्मचारी कोणत्याही समस्येनं ग्रस्त असतील ते या सर्व समस्या प्रशासन विभागाच्या सह-पोलीस आयुक्तांसमोर मांडतील. तसेच या सर्व पोलिस अधिकारी-कर्मचा-यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा निर्धार वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी केल्याने,पोलिस दलातुन समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तर वरिष्ठ पोलिस अधिका-यांचा पाठींबा असल्याने, कोरोनाच्या संकटात संपूर्ण झोकुन देऊन काम करणा-या पोलिसांना दिलासा मिळाला आहे. राज्यात जवळपास 2 हजार 95 पोलिस कोरोनाने ग्रस्त आहेत. तर हीच आकडेवारी मुंबईत सर्वात मोठी आहे. त्यात एक हजार 859 कर्मचारी, तर 236 अधिका-यांचा समावेश आहे. त्यातील मुंबईत एक हजार 203 एवढे पोलीस कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत.  तर यातील जवळपास 200 पोलिस कोरोनावर मात करीत पुन्हा ऑन ड्युटी हजर झाले आहेत. कोरोनाच्या महामारीला कायमस्वरुपी पराजित करण्यासाठी हे कोरोना योद्धे सज्ज झाले आहेत.

तर दुसरीकडे या कोरोना योद्ध्यांना देखील अनेक समस्या तसेच अडी-अडचणीना सामोरे जावे लागत आहे. यामध्ये महिला पोलिस अधिकारी-कर्मचा-यांची संख्या अधिक आहे. त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहेत. यामुळे या सर्व पोलिसांच्या समस्यांची सोडवणुक करण्यासाठी प्रशासन विभागाच्या सह-पोलिस आयुक्तांनी व्हिडीओ काॅन्फरसिंगद्वारे आज्ञांकित कक्ष सुरु केला आहे. यापुर्वी या आज्ञांकित कक्षाद्वारे पोलिस आयुक्तांना देखील भेटुन समस्या मांडता येत होत्या. मात्र सध्याची कोरोना सदृश परिस्थिती पाहता, ते शक्य नसल्याने व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे आज्ञांकित कक्ष सुरु केला असुन, या सर्व समस्या प्रशासन विभागाच्या सह-पोलीस आयुक्तां समोर मांडता येणार आहेत. यासाठी ज्या पोलिसांच्या समस्या आहेत, त्यांनी कक्ष दोनशी संपर्क साधत नावे नोंदविण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार, या सर्व पोलिसांच्या समस्या सोडविण्यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिका-याने दिली.


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा