चारकोपमध्ये गॅस एजन्सीच्या मॅनेजरला लुटले


चारकोपमध्ये गॅस एजन्सीच्या मॅनेजरला लुटले
SHARES

कांदिवलीच्या चारकोप परिसरात गॅस एजन्सीमधील जमा झालेली सर्व रक्कम घेऊन  घरी जाणाऱ्या एजन्सीच्या मॅनेजरला लुटल्याची  घटना चारकोपर परिसरात घडली आहे. थोडेथोडके नाही तर चोरांनी तब्बल ६ लाख रुपये चोरून लुबाडले आहेत. या प्रकरणी चारकोप पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

हेही वाचाः-सर्वांसाठी लोकल सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा

मालाडच्या मालवणी परिसरात राहणारे अलीमोहम्मद अल्ताफहुसेन शेख (२९) हे कांदिवली परिसरातील एका गॅस एजन्सीमध्ये मॅनेजर म्हणून कामाला आहे. दिवसभरात हजारो गॅस धारकांकडून जमा झालेले पैसे ते दुसऱ्या दिवशी बँकेत संबधित कंपनीच्या खात्यावर भरतात. दरम्यान शनिवारी रात्री एजन्सी बंद केल्यानंतर जमा झालेली ६ लाख ३ हजार रुपये घेऊन शेख हे घरी चालत निघाले होते. एमजी रोड, गणेश हाँटेलच्या सिग्नलजवळ ते पोहचले असताना. दुचाकीहून आलेल्या चार अनोळखी व्यक्तींनी त्यांचा रस्ता रोखून त्यांचीशी वाद घालण्यास सुरवात केली.   अचानक आरोपींनी शेख यांना धक्काबुक्की करत त्यांच्या हातातील बॅग हिसकवण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत आरोपींनी शेख यांची बॅग हिसकावून पळ काढला. या प्रकरणी शेख यांनी चारकोप पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी चौघांवर ३९३,३४ भा.द.वि कमांतर्गत गुन्हा नोंदवला असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा