संचार बंदीच्या पार्श्वभूमिवर स्वत: पोलिस आयुक्त ऑन फिल्ड


संचार बंदीच्या पार्श्वभूमिवर स्वत: पोलिस आयुक्त ऑन फिल्ड
SHARES
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर शहरात कायदा आणि सुव्यवस्था बिघडु नये, यासाठी मुंबई पोलीस आयुक्त ऑन फिल्ड होते. यावेळी त्यांनी अनेक ठिकाणांना भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली. मुंबईत कोरोनाचे दिवसेंदिवस नवे रुग्ण आढळत असताना, नागरिकांना आवाहन करून सुद्धा ते रस्त्यावर उतरत असल्याने मुख्यमंञी उद्धव ठाकरे यांनी सोमवारी संचार बंदीचे आदेश जारी केले.

 पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पहाटे पाच वाजता मरीन ड्राईव्ह परिसराची पाहणी केली. यावेळी परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त डॉ संग्रामसिंग निशाणदार देखील उपस्थित होते. शहरात जमावंबदी  असताना देखील याला नागरीकानी हा आदेश धाब्यावर बसवला. खुलेआम नागरीक गाड्या घेऊन रस्त्यावर उतरत होते. यामुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होण्याची शक्यता असल्याने, पोलीस आयुक्तांनी संपूर्ण शहरातील रस्त्यवर फिरण्यास सुरुवात केली आहे. यावेळी नाकाबंदी तसेच बंदोबस्तावर असलेल्या पोलिस अधिकारी-कर्मचाऱयांना भेटुन पोलीस आयुक्तांनी या योग्य त्या सुचना दिल्या आहेत.

 त्याचप्रमाणे, अनेकदा समजाऊन देखिल नागरीक ऐकत नसतील तर त्याच्या सुरक्षतेसाठी कठोर वागण्याचे आदेश देखील पोलीस आयुक्तांनी दिल्याचे समोर आले आहे. त्याचप्रमाणे, रस्त्यावर नाकांबदी आणि बंदोबस्त करताना या अधिकारी-कर्मचाऱयांना देखील त्यांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
शहरातल्या महत्वाच्या रस्त्यांवर नाकाबंदीचे आदेश आयुक्तांनी दिले असून अनावश्यक घराबाह्र पडलेल्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच संचार बंदी असल्याने मुलांना आणि खासगी कंपन्यांना सुट्टी देण्यात असल्याने अनेक ठिकाणी मुले खेळण्यासाठी बाहेर पडत आहे. त्यांना सुरूवातीला समजवून जाण्यास विनंती करावी. अन्यथा कायद्यानुसार कारवाई करण्यास आयुक्तांनी सांगितले आहे. जमावबंदी आणि लॉकडाऊनचा आदेश धुडकाऊन लावणाऱया नागरीकांवर 188 अन्वय्ो कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत  
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा