वांद्रे प्रकरण: अफवा पसरवणाऱ्या पत्रकाराला अटक, 30 अकाऊन्ट रडारवर


वांद्रे प्रकरण: अफवा पसरवणाऱ्या पत्रकाराला अटक, 30 अकाऊन्ट रडारवर
SHARES
देशात कोरोनाचे थैमान वाढत असताना मुंबईत कोरोना बाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. अशातच मंगळवारी वांद्रे जमावाने रस्त्यावर एकञ जमल्याने प्रशासनाच्या डोकेदुखीत आणखी वाढ झाली. माञ ही गर्दी जमली ती सोशल मिडियावरील खोट्या अफवांनी, सायबर पोलिसांनी वांद्रे येथील गर्दी जमण्यास कारणीभूत ठरणाऱ्या एका नामकिंत वृत्त वाहिनीच्या पञकारावर गुन्हा नोंदवत त्याला अटक केली. तर वांद्रे प्रकरणा संबधित अफवा पसरवणाऱ्या सोशल मिडियावरील 30 अकाऊन्टवर पोलिस लक्ष ठेवून आहेत. भविष्यात त्यांच्यावर ही  गुन्हा नोंदवला जाऊ शकतो. तर राज्यभरात अशा अफवा पसरवणाऱ्यांची संख्या 201 इतकी झाली आहे.

देशात बुधवारी संपणाऱ्या  लॉकडाउनमध्ये वाढ झाल्याने संयम सुटलेल्या उत्तर भारतीय कामगारांनी मंगळवारी वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेर संताप व्यक्त करत एकच गर्दी केली. खायला अन्न नाही, हाताला काम नसल्यामुळे या कामगारांचा संयम सुटल्याचे पहायला मिळाले. माञ सध्याची परिस्थिती पाहता अशा वेळी ऐवढ्या मोठ्या गर्दीने जमणे म्हणजे कोरोनाला आंमञण देण्यासारखेच झाले. वेळीच त्या वेळी पोलिसांनी परिस्थिती हाताळली. पोलिसांनी वाढीव कुमक मागवून जमाव पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला. माञ ही गर्दी जमण्यामागे सोशल मिडियावरील अफवांचा हात असल्याची धक्कादायक माहिती आता पुढे आली आहे. या गर्दी करणाऱ्या कामगारांच्या मोबाइलवर 30 पेक्षा जास्त सोशल मीडिया अकाऊन्ट वरून ट्रेन सर्विसबद्दल अफवांचे मेसेज पाठवण्यात आले होते. हे सर्व अकाऊन्ट सायबर पोलिसांच्या रडारवर आहेत. वांद्रे प्रकरणात आता पर्यंत पोलिसांनी 3 वेगवेगळे गुन्हे नोंदवले आहेत. त्यातील पहिला हा एकञ आलेल्या जमावावर, दुसरा विनय दुबेवर आणि तिसरा मराठी वृत्त वाहिनीच्या पञकारावर गुन्हे नोंदवण्यात आले आहे. यातील दोन प्रकरणात आता पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. त्यात अफवा पसरवण्याच्या नावाखाली एका नामकिंत मराठी वृत्तवाहिनीवर ही पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. आतापर्यंत सोशल मीडियावरून अफवा पसरवल्याप्रकरणी एकूण 35 लोकांना अटक करण्यात आली असून 114 लोकांची ओळख पटवण्यात आलीय लवकरच त्यांनासुद्धा अटक करण्यात येणार असल्याची सायबर पोलिसांकडून देण्यात आली आहे.


महाराष्ट्र राज्यातील विविध पोलीस ठाण्यात 14 एप्रिलपर्यंत 201 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. त्यामध्ये सर्वाधिक 26 गुन्हे बीड जिल्ह्यात नोंदविले आहेत. कोल्हापूर 15, जळगाव 13, पुणे ग्रामीण 11, मुंबई 10, सांगली 10,जालना 9, नाशिक ग्रामीण 8 ,सातारा 7, नांदेड 7, परभणी 7, नाशिक शहर 6, नागपूर शहर 5, सिंधुदुर्ग 5 , ठाणे शहर 5, बुलढाणा 4, पुणे शहर 4, लातूर 4, गोंदिया 4, सोलापूर ग्रामीण 5, सोलापूर शहर 3. नवी मुंबई 2, उस्मानाबाद 2, ठाणे ग्रामीण 1,धुळे 1 यांचा प्रामुख्याने समावेश आहे . यात आक्षेपार्ह व्हाट्सअँप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी 99 गुन्हे तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी 66 गुन्हे दाखल करण्यात आले. Titktok विडिओ शेअर प्रकरणी 3 तर ट्विटर द्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी 3 गुन्हे दाखल झाले आहेत .अन्य सोशल मीडियाचा ( ऑडिओ क्लिप्स, youtube) गैरवापर केल्या प्रकरणी 37 गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आतापर्यंत 37 आरोपींना अटक केली आहे .
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा