मुंबईसह महाराष्ट्रावर ड्रोन हल्ल्याची शक्यता, सुरक्षा यंत्रणेकडून अलर्ट

मुंबईसह महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरं अलर्टवर आहेत.

मुंबईसह महाराष्ट्रावर ड्रोन हल्ल्याची शक्यता, सुरक्षा यंत्रणेकडून अलर्ट
SHARES

राज्यात ड्रोनच्या माध्यमातून हल्ला होण्याचा धोका (Drone Attack Alert) व्यक्त केला जात आहे. केंद्रीय तपास यंत्रणेच्या मार्फत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रातील (Cities in Maharashtra) सर्व प्रमुख शहरं अलर्टवर आहेत.

तपास यंत्रणांना नुकतेच अशी माहिती मिळाली आहे की, डार्क नेटचा वापर करुन मुंबई आणि महाराष्ट्रात ड्रोन हल्ल्या घडवण्याबद्दल दहशतवादी संभाषण करत आहेत.

मुंबई आणि महाराष्ट्रात ड्रोन हल्ल्यांबाबतचं संभाषण चौकशी यंत्रणांना कळल्यानं पोलीस यंत्रणा खडबडून जागी झालीय. विशेष म्हणजे महाराष्ट्रात असं काही घडलं तर आपल्याकडे अँटी-ड्रोन यंत्रणाही नाही.

महाराष्ट्र सायबर IG यशस्वी यादव यांनी यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले की, "दहशतवादी सहानुभूती बाळगणारे ड्रोन हल्ले, रासायनिक हल्ले आणि सायबर हल्ल्यांबद्दल डार्क नेटवर बोलताना दिसतात. पृष्ठभागाच्या जाळ्याच्या तुलनेत डार्क नेट 99% आहे. टोर ब्राउझर डार्क नेटमध्ये वापरला जातो, जो सहज पकडता येत नाही. कारण त्यात अनेक प्रॉक्सी बाऊन्सिंगचा वापर केला जातो. दरम्यान, मुंबईसह इतर महत्त्वाच्या शहरांवर ड्रोन हल्ल्यांबाबत अनेकदा अलर्ट दिले जातात.

महाराष्ट्रात लवकरात लवकर ड्रोनविरोधी यंत्रणा बसवणं गरजेचं आहे. ड्रोन हल्ल्यात २० किमी ते ३० किमी अंतरावरूनही हल्ला केला जाऊ शकतो.

ड्रोनवर पेलोड बसवता येतात. याशिवाय, त्यांना बॅकट्रॅक करणं फारसं सोपं नाही. जर एखाद्या गुन्हेगारानं मोबाईल फोन वापरला तर त्याचा आयएमईआय (IMI Number) क्रमांकावरून शोध लावला जाऊ शकतो, परंतु ड्रोनचा वापर करणाऱ्या गुन्हेगाराचा शोध लावता येत नाही.

याच कारणामुळे आता महाराष्ट्र सरकार देशात प्रथमच सायबर सुरक्षा प्रकल्प आणत आहेत, असं महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलंय. सुमारे ९०० कोटींचा हा प्रकल्प असून, नवी मुंबईतील महापे परिसरात उभारण्यात येणार आहे.हेही वाचा

शाहरुख खानचा ‘मन्नत’ बॉम्बने उडवून देण्याची धमकी; आरोपीला अखेर अटक

धारावीतील बोगस लसीकरण सर्टिफिकेट बनवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा