लॉकडाऊनमध्ये या बहादरानं सुरू केला थेट ड्रग्जचा धंदा

या कारवाईत पोलिसांनी नऊ किलो गांजाचा साठा जप्त केला असून त्याची किंमत १ कोटी ६२ लाख रुपये आहे

लॉकडाऊनमध्ये या बहादरानं सुरू केला थेट ड्रग्जचा धंदा
SHARES

मुंबईत कोरोना संक्रमाणामुळे सर्वत्र लॉकडाऊन करावे लागले. या लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या नोकऱ्या केल्या उदर निर्वाहासाठी कुणी भाज्यांचा स्टाँल लावला, तर कुणी मासे विकले. या ना त्या मार्गाने बहुतांश जणांन स्वत:चा स्वतंत्र व्यवसायच सुरू केला. मात्र अशाच एका बहादरानं  अमेरिकेतून आल्यानंतर मित्राच्या मदतीने आर्थिक भार दूर करण्यासाठी थेट ड्रग्ज विक्रीचा व्यवसाय सुरू केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यश गिरीश कलानी आणि गुरू दयाल जयस्वाल अशी या दोघांची नावे आहेत. या कारवाईत पोलिसांनी नऊ किलो गांजाचा साठा जप्त केला असून त्याची किंमत १ कोटी ६२ लाख रुपये आहे. या प्रकरणी एएनसीचे अधिकारी अधिक तपास करत आहेत.

हेही वाचाः- मुंबईत कोरोनाचे ९९८ नवे रुग्ण, २३ जणांचा दिवसभरात मृत्यू

यश कलानी हा व्यावसायाने सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. चांगल्या कुटुंबातील असलेला यश याने त्याचे शिक्षण ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे घेतले आहे. सध्या तो वांद्रे येथील कार्टररोड परिसरात कुटुंबियांसोबत राहत होता. त्याची स्वतःची सॉफ्टवेअर सिस्टीम फर्म आहे. लॉकडाऊन पूर्वी तो स्वतःच्या सेवनासाठी अमेरीकेतून वीड(गांजा) मागवायचा. डार्कने नेटच्या मााध्यमातून मागणी केल्यानंतर ई वॉलेटच्या माध्यमातून हा व्यवहार व्हायचा. त्यानंतर कुरिअरद्वारे त्याला ही ड्रग्स मिळायची. पण लॉकडाऊनमध्ये आर्थिक भार आल्यामुळे त्यांनी सेवनाऐवजी व्यावासायिक वापरासाठी ड्रग्स मागवण्याचा विचार केला. अमेरीकेतील एका व्यक्तीने त्याला यात मदत केली. त्यानंतर तो ड्रग्स घेऊन मुंबई, पुणे, दिल्ली, चेन्नई, बंगळुरू येथे वितरीत करू लागला. ती ड्रग्स दीड ते साडे तीन हजार रुपये प्रतिग्रॅम विकल्यामुळे त्याला दररोज एक लाख रुपयांचा फायदा होऊ लागला. त्यामुळे त्याने वांद्रे येथील एक बंगलाही ड्रग्स लपवण्यासाठी भाड्याने घेतला. त्याच्या वितरणासाठी त्याने रिक्षा चालक गुरू जयस्वाल याला हाताशी घेतले.

हेही वाचाः- चित्रपट निर्माता फिरोज नाडियादवालाच्या पत्नीला ड्रग्सप्रकरणात अटक

गुरु आणि यश हे दोघेही वांद्रे परिसरात राहत असून ते ड्रग्ज तस्करीत सक्रिय होते. ड्रग्स विक्रीसाठी ते वांद्रे परिसरात येणार आहेत अशी माहिती वांद्रे युनिटच्या अधिकार्‍यांना मिळाली होती, या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती. गुरुवारी सायंकाळी तिथे यश आणि गुरु आले होते, यावेळी त्यांच्याकडे प्रत्येकी एक किलो वजनाचे उच्च प्रतीचे विदेशी गांजा सापडला, त्याची किंमत सुमारे ३६ लाख रुपये होती. या दोघांच्या चौकशीत त्यांनी  वांद्रे येथील पाली गाव  येथील बंगल्यात ड्रग्स ठेवल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी तिथे छापा टाकून आणखीन सात किलो गांजाचा साठा जप्त केला. या कारवाईत पोलिसांनी नऊ किलो गांजाचा साठा जप्त केला असून त्याची किंमत १ कोटी ६२ लाख रुपये आहे

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा