चिमुरडीच्या गळ्यातील सोनसाखळीवर डल्ला

 Cheetah Camp
चिमुरडीच्या गळ्यातील सोनसाखळीवर डल्ला

ट्रॉम्बे - घराबाहेर खेळत असलेल्या दोन वर्षीय मुलीच्या गळ्यातील सोनसाखळी आणि हातातील सोन्याच्या बांगड्यांवर दिवसाढवळ्या डल्ला मारण्याची घटना गुरुवारी सकाळी ट्रॉम्बे चित्ता कॅम्प परिसरात घडली.

या भागात राहणारे नईम खान एका नातेवाईकाच्या लग्नासाठी सी सेक्टर परिसरात मुलगी आणि पत्नीसह गेले होते. याच दरम्यान मुलगी घराबाहेर खेळत असताना एका चोरट्यानं मुलीच्या गळ्यातील सोनसाखळी आणि हातातील बांगड्या असा 17 हजारांचा ऐवज घेऊन पळ काढला. याबाबत खान यांनी ट्रॉम्बे पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

Loading Comments