ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांना दगड आणि चपला देणारा भामटा गजाआड

  Mahalakshmi
  ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांना दगड आणि चपला देणारा भामटा गजाआड
  मुंबई  -  

  ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांना दगड आणि चपला देणाऱ्या भामट्याला मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. लेद्रू मोहम्मद खान असं या भामट्याचे नाव असून, त्याने तब्बल 32 ग्राहकांना गंडा घातल्याचे तपासात समोर आलं आहे. हा भामटा ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांना दगड,जुन्या चपला आणि प्लास्टिकच्या वस्तू देऊन त्यांच्याकडून पैसे उकळत असे. लेद्रू एका टेलिशॉपिंग कंपनीसाठी काम करणाऱ्या कॉल सेंटरमध्ये काम करत होता. त्याच दरम्यान त्याने त्याच कंपनीच्या ग्राहकांना गंडा घालण्याचा प्रताप सुरू केला होता.

  टेली शॉपिंग कंपनीच्या 'ट्रॅक माय ऑर्डर' या साईटवरून 400 ते 500 ऑर्डर नंबर तो सर्च करत असे. एखादा ऑर्डर नंबर जुळताच ग्राहकाचा पत्ता आणि त्याने बूक केलेल्या वस्तूची माहिती त्याला मिळत असे. त्यानंतर हा कॉलसेंटरवरून फोन करून ऑर्डर नंबर देऊन ग्राहकांचं नाव आणि मोबाइल नंबर प्राप्त करत असे. ग्राहकांचा मोबाईल नंबर मिळताच हा तो ग्राहकाला फोन करून ऑर्डर केलेली वस्तू घेऊन थेट ग्राहकाच्या घरात पोहोचत असे आणि ग्राहकाकडून वस्तूचे पैसे घेऊन तिथून पसार होत असे. जेव्हा ग्राहक पार्सल उघडून बघत असत तेव्हा त्यांना मागवलेल्या वस्तूऐवजी जुन्या चपला,दगड मिळत असत. पोलिसांना या भामट्याबद्दल जेव्हा समजलं तेव्हा गुन्हे शाखा कक्ष 2 ने त्याला दिघा गावातून अटक केली.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.