नालासोपाऱ्यात घरफोडी, लाखोंचा ऐवज लंपास


नालासोपाऱ्यात घरफोडी, लाखोंचा ऐवज लंपास
SHARES

कुलुपबंद घाराचे टाळे तोडून पैसे आणि लाखो रुपयांचे दागिने चोरट्यांनी पळवल्याची घटना नालासोपारा (प.) येथील निलेगावमध्ये घडली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात पोलिसींत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार नालासोपारा (प.) येथील निलेगावमधील जयमाला इमारतीतल्या रुम नं 205 मध्ये कस्तुरीबाई अनुकर (59) त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. काही कामानिमित्ताने त्या बाहेर गेल्या होत्या. त्याचाच फायदा घेत चोरट्यांनी घराचे टाळे तोडून घरातल्या कपाटात ठेवलेल्या लाखो रुपयांच्या सोन्या-चांदीचे दागिने आणि पैसे घेऊन फरार झाले. कस्तुरी जेव्हा घरी आल्या तेव्हा घराचे कुलुप तुटले होते आणि घरातील सामान अस्तव्यस्त झाले होते. घरातील सोने चांदीचे दागिनेही गायब असल्याचे समजल्यानंतर त्यांनी यासंदर्भात पोलिसांना कळवले. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी चौकशी करत अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी दिलेल्या माहितीनुसर चोरट्यांनी घारातून 4,48,500 रुपयांची चोरी केली आहे. अज्ञात आरोपींविरोधात कलम 454,457,380 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा