सेलिब्रिटींचा 'पर्सनल' डेटा चोरीला? प्रसिद्ध पीआर हिमांशू झुनझुनवालाच्या गाडीवर चोरांचा डल्ला

अंबोलीत चोरांनी अवघ्या काही मिनिटांत सेलिब्रिटी पीआर हिमांशू झुनझुनवाला यांच्या गाडीची काच फोडून लाखोंचा ऐवज चोरला. त्यात महत्त्वाची कागदपत्रे, लॅपटाॅप आणि पेनड्राइव्हचा समावेश आहे. विशेष म्हणजे या सर्व सामानांत बऱ्याच सेलिब्रिटींचे फोटो, अागामी सिनेमाची माहिती असल्याने या खासगी माहितीचा दुरूपयोग होण्याची दाट शक्यता आहे.

सेलिब्रिटींचा 'पर्सनल' डेटा चोरीला? प्रसिद्ध पीआर हिमांशू झुनझुनवालाच्या गाडीवर चोरांचा डल्ला
SHARES

अवघ्या काही मिनिटांत गाडीच्या काचा फोडून चोरी करणाऱ्या टोळीने प्रसिद्ध सेलिब्रिटींचे पीआर हिमांशू झुनझुनवाला यांच्या गाडीला सोमवारी लक्ष्य केलं. झुनझुनवाला कामानिमित्त अंबोली परिसरात आले असताना चोरांनी अवघ्या काही मिनिटांत त्यांच्या गाडीची काच फोडून लाखोंचा ऐवज चोरला. त्यात महत्त्वाची कागदपत्रे, लॅपटाॅप आणि पेनड्राइव्हचा समावेश आहे. विशेष म्हणजे या सर्व सामानांत बऱ्याच सेलिब्रिटींचे फोटो, अागामी सिनेमाची माहिती असल्याने या खासगी माहितीचा दुरूपयोग होण्याची दाट शक्यता आहे.



नेमकं काय झालं?

चारकोप परिसरात राहणारे झुनझुनवाला सोमवारी कामानिमित्त अंधेरीला आले होते. त्यावेळी त्यांनी त्यांची कार न्यू लिंक रोडवरील सीटी मॅालच्या समोरील पार्किंगमध्ये उभी केली. अवघ्या काही मिनिटांत आपल्या मित्राला भेटून ते परत आले. त्यावेळी गाडीच्या मागच्या खिडकीची काच फुटल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. तसेच गाडीतील लॅपटॅाप, बँकेची महत्वाची कागदपत्रं, बॅालीवूडमधील अनेक सेलीब्रिटींचे फोटो आणि विविध आगामी चित्रपटाची माहिती असलेले ५० पेनड्राइव्ह आणि इतर असा लाखों रुपयांचा डेटा चोरीला गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं.



तक्रारीची नाेंद

त्यानंतर झुनझुनवाला यांनी थेट अंबोली पोलीस ठाणे गाठत अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणी अंबोली पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे. चोरीची ही घटना जवळील एका दुकानाच्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलीस त्या कॅमेऱ्यातील फुटेजच्या मदतीने आरोपीची ओळख पटवत आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा