तुम्हालाही फोनवर इन्स्टावरून अश्लील कॉल सर्विस मेसेज आला असेल, तत्पूर्वी ही बातमी वाचा

एवढ्यावरच न थांबता आरोपीने व्यावसायिकाची बदनामी करण्यासाठी आरोपीने इस्टाग्रामवर तक्रारदाराच्या नावाचे बनावट खाते तयार करून अश्लील कॉल सुविधा वापरत असलेला व्यक्ती असल्याची बदनामी केली.

तुम्हालाही फोनवर इन्स्टावरून अश्लील कॉल सर्विस मेसेज आला असेल, तत्पूर्वी ही बातमी वाचा
SHARES

इन्स्ट्राग्रामवर अश्लील सर्व्हिसबाबतचा जर का मेसेज आला. तर त्याला प्रतिउत्तर देऊ नका अन्यथा तुम्हची देखील अशा प्रकारे फसवणूक होऊ शकते. मलबाह हिल परिसरात राहणाऱ्या एका व्यवसायिकाला नुकताच असा अनुभव आलेला आहे. या प्रकरणी त्याने मलबार हिल पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. एवढ्यावरच न थांबता आरोपीने व्यावसायिकाची बदनामी करण्यासाठी आरोपीने इस्टाग्रामवर तक्रारदाराच्या नावाचे बनावट खाते तयार करून अश्लील कॉल सुविधा वापरत असलेला व्यक्ती असल्याची बदनामी केली. याप्रकरणी मलबार हिल पोलिस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचाः- कोरोनावर आली गोळी, १०३ रुपयांच्या गोळीचं मुंबईत उत्पादन सुरू

मलबार हिल येथे राहणा-या व्यावसायिकाला १९ मेला एका महिलेच्या इस्टाग्राम खात्यावरून संदेश आला होता. त्यात व्हिडिओ कॉल सर्विस पुरवण्यात येते, असं नमुद करण्यात आलं होतं. त्यानंतर या महिलेने एक अश्लील व्हिडिओ या व्यावसायिकाला पाठवला. त्याकडे दुर्लक्ष केल्यानंतर तक्रारदाराला व्हिडिओ कॉल आला. त्यात महिला नग्न अवस्थेत एक महिला बसलेली होती. १० सेकंद चाललेल्या या दूरध्वनीनंतर तक्रारदाराला खंडणीसाठी दूरध्वनी येऊ लागले. सुरूवातीला २० हजार भरल्यांनतर या व्यावसायिकाच्या पत्नीलाही आरोपीचे दूरध्वनी येऊ लागले. तिनेही बदनामीच्या भीतीने २० हजार रुपये दिले. पुढे  तक्रारदार व्यावसायिकाच्या नावाने बनावट इस्टाग्राम खाते तयार करून त्यावर हा व्यक्ती अश्लील कॉल सर्विसचा वापर करत असल्याचे आरोपीने नमुद केले होते.

हेही वाचाः-सोशल मिडिया आणि व्हाँट्स अँपवरचे मेसेज पुढे पाठवताना घ्या काळजी

 हा संदेश व्यावसायिकाच्या ओळखीच्या व्यक्तीने पाहिल्यानंतर त्याला बाबत माहिती दिली. व्यवसायिकाने याबाबत पडताळणी केली असता संबंधीत इस्टाग्राम खाते एक पुरुष दिल्लीतून हाताळत असल्याची माहिती समजली. अखेर या व्यवसायिकाने याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यानुसार सायबर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

संबंधित विषय