नीता भाभी और मुकेश भैय्या, ये तो ट्रेलर है, स्कॉर्पिओमध्ये सापडलं धमकीचं पत्र

पोलिसांनी चिठ्ठीतील मजकुराबाबत सविस्तर माहिती अद्याप दिलेली नाही. तसेच, अंबानी यांच्या ताफ्यातील आणखी काही गाड्यांच्या नंबर प्लेट पोलिसांना सापडल्या असल्याची माहिती समोर येत आहे.

नीता भाभी और मुकेश भैय्या, ये तो ट्रेलर है, स्कॉर्पिओमध्ये सापडलं धमकीचं पत्र
SHARES

रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानाबाहेर गुरुवारी स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार आढळली आहे. या कारमध्ये २० जिलेटिन कांड्या होत्या. मुंबई पोलिसांना या कारममध्ये एक पत्रही आढळलं आहे. नीता भाभी और मुकेश भैय्या, ये तो ट्रेलर है, अशी धमकी या पत्रातून देण्यात आली आहे. 

पोलिसांनी चिठ्ठीतील मजकुराबाबत सविस्तर माहिती अद्याप दिलेली नाही. तसेच, अंबानी यांच्या ताफ्यातील आणखी काही गाड्यांच्या नंबर प्लेट पोलिसांना सापडल्या असल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईतील अल्टामाऊंट रोडवर मुकेश अंबानी यांची भव्य अँटिलिया इमारत आहे. 

बुधवारी मध्यरात्री एक वाजता अँटिलियाजवळ ही स्कॉर्पिओ  पार्क केल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फूटेजमधून समोर आलं आहे. अंबानी यांच्या ताफ्यातील गाडीचा नंबर आणि स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ कारचा नंबर सारखाच असल्याचं समोर आलं आहे. 

 या घटनेनंतर पोलिसांनी अंबानींच्या घराबाहेर बंदोबस्तात वाढ केली आहे. जलद प्रतिसाद पथकही तैनात करण्यात आलं आहे. येथील रोडवर मोठया प्रमाणावर पोलिसांसह कमांडोही तैनात करण्यात आले आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलीस तपासत आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा