तुमच्या घरात भेसळयुक्त दूध तर येत नाही ना ?, भेसळयुक्त दूधाची विक्री करणाऱ्यांचा पर्दाफाश

अमूल, गोकुळ, यासारख्या नामांकित कंपनीच्या दुधामध्ये दूषित पाणी मिसळून त्याची विक्री केली जात असल्याचे आढळून आले.

तुमच्या घरात भेसळयुक्त दूध तर येत नाही ना ?, भेसळयुक्त दूधाची विक्री करणाऱ्यांचा पर्दाफाश
SHARES

 देशात कोरोनाशी दोन हात करण्यास संपूर्ण प्रशासन व्यस्त असताना. दुसरीकडे परिस्थितीचा फायदा घेत, नागरिकांना भेसळयुक्त दूध देणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखा १२ च्या पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीकडून पोलिसांनी सुमारे सहाशे लिटर भेसळयुक्त दूध आणि इतर साहित्य हस्तगत केले आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलिस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचाः- 'त्या' ट्रॅफिक हवालदाराचा भररस्त्यात महिला एसीपींकडून सन्मान

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर मुख्यमंत्र्यांनी सर्वांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असताना. या रोगाच्या पार्श्वभूमिवर काही जणांनी काळाबाजार सुरू केला आहे. मुलुंडमध्ये कोरोना बरा करण्याच्या नावाखाली अन्न पचनाच्या गोळ्या देण्यता येत होत्या, तर काही ठिकाणी मास्क जादा किंमतीला विकले जात होते. त्यानुसार दिंडोशी शिवाजीनगर परिसरात दूधात काही जण काळाबाजार करत असल्याची माहिती गुन्हे शाखा १२ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश तावडे यांना मिळाली होती. तावडेंच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट १२ चे अधिकारी सचिन गवस, प्रकाश सावंत, हरिष पोळ आणि पथकाने दिंडोशीच्या शिवाजीनगर या परिसरात छापेमारी केली. त्यावेळी त्यांना अमूल, गोकुळ, यासारख्या नामांकित कंपनीच्या दुधामध्ये दूषित पाणी मिसळून त्याची विक्री केली जात असल्याचे आढळून आले.

हेही वाचाः- अंबानी कुटुंबाला झेड प्लस सुरक्षा देण्यामागे फक्त ‘हेच’ कारण?

पहाटे हे दूध येत असल्याने अंधारात दोन व्यक्ती ब्लेडने दुधाच्या पिशव्या फोडून त्यामध्ये दूषित पाणी भरून पुन्हा मेणबत्तीच्या साहाय्याने चिकटवीत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी सुमारे सहाशे लिटर भेसळयुक्त दूध जप्त करून त्याच ठिकाणी नष्ट केले. या प्रकऱणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.  रामकृष्ण चंद्रया दंडपल्ली, महेश चंद्रया दंडपल्ली, सूरेश सनकारी अशी या आरोपींची नावे आहेत. या तिघांविरोधात दिंडोशी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

संबंधित विषय