एटीएम कॅश व्हॅन चोरीचा 24 तासात पर्दाफाश

 Dharavi
एटीएम कॅश व्हॅन चोरीचा 24 तासात पर्दाफाश

धारावी - एटीएम कॅश व्हॅन लुटणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केलीय. गुरुवारी एटीएम कॅश व्हॅन लुटण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवली आणि तिघांना सातारा जिल्ह्यातील आणेवाडी टोलनाका येथून अटक केली. हे तिघे ट्रॅव्हल्समधून तामिळनाडूला जात होती. माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून तिघांना अटक केली.

सुरेशकुमार पांडुरंगम, अरुमुग्म सुब्रमनी शेरवे हे दोघे तामिळनाडूचे राहणाारे आहेत. तर कमला नागराज देवेंद्र हा अँटॉप हिलचा राहणारा आहे. या तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून दीड कोटी पैकी 15 लाख 42 हजार 100 रुपये रोख रक्कम हस्तगत केली आहे. तर याच गुन्ह्यातील इतर साथीदारांचीही नावे तिघांनी पोलिसांसमोर अघड केली आहेत. पोलीस इतर 9 आरोपींचा शोध घेत आहेत.

मुंबईतील धारावीत गुरुवारी दुपारी पावणे तीन वाजता एसबीआयच्या एटीएमची कॅश लुटल्यानं एकच खळबळ उडाली होती. दिवसाढवळ्या झालेली ही चोरी सीसीटीव्हीत कैद झाली.


Loading Comments