कर्जबाजारी झाल्याने छापल्या बनावट नोटा


कर्जबाजारी झाल्याने छापल्या बनावट नोटा
SHARES

मुंबई गुन्हे शाखेने 2000 च्या बनावट नोटा बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला असून त्यांच्याकडून तब्बल 70 लाख किंमतीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. गुन्हे शाखेने मुख्य आरोपी जतीन सोलंकी (37), विजय बालाजी कांबळे(39) आणि सचिन बंसी (25) या तिघांना अटक केली आहे. विशेष म्हणजे या बनावट नोटा अत्याधुनिक प्रिंटरच्या सहाय्याने अगदी हुबेहुब बनवण्यात आल्या असून, त्या ओळखता येणे अवघड असल्याचं सांगितले जात आहे. विशेष म्हणजे विजय कांबळे हा गोरेगाव येथील आरपीआईचा कार्यकर्ता आहे.

काही दिवसांपूर्वी गुन्हे शाखा क्रमांक 9 ला एक गुप्त माहिती मिळाली की, खऱ्या नोटांच्या बदल्यात कित्येक पट बनावट नोटा मिळत आहेत. या आरोपांची पडताळणी केल्यावर गुन्हे शाखेने सापळा लावला आणि या तिघांना 70 लाखांच्या बनावट 2000 रूपयांच्या नोटांसह अटक केली. जतीन सोलंकी हा कर्ज बाजारी झाला असून, ते फेडण्यासाठी त्याने ही भन्नाट कल्पना आखली. दुसरा आरोपी सचिन बंसी हा एक डीटीपी ऑपरेटर असून, त्याने जतीनला नोटा बनावण्यात मदत केली तर विजय कांबळे याने प्रिंटींग मशीन घेण्यासाठी पैसे दिले. 'या प्रकरणी आम्ही तीन आरोपींना अटक केली असून, 70 लाखांच्या बनाबट नोटा तसेच एक आधुनिक प्रिंटर जप्त केल्याची 'महिती डीसीपी शशिकांत सातव यांनी दिली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा