मानखुर्दमध्ये तीन बांगलादेशींना अटक

 Mandala
मानखुर्दमध्ये तीन बांगलादेशींना अटक

मानखुर्द - अनधिकृत वास्तव्य करणाऱ्या दोन महिलांसह तीन बांगलादेशींना रविवारी मानखुर्द येथून अटक करण्यात आली. गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. चौकशीतून हे तिघेही बांगलादेशातून चोरट्या मार्गाने मुंबईत आल्याचं उघडकीस आलं आहे. अटकेनंतर या तिघांनाही गुन्हे शाखेने मानखुर्द पोलिसांच्या स्वाधीन केलं. पोलिसांनी त्यांना रविवारी न्यायालयात हजर केलं. या वेळी न्यायालयानं त्यांना सोमवारपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. समशुल महबुल शेख, रजिया सिद्दिक शेख आणि हसिना बेगम सुलेमान अन्सारी अशी अटक झालेल्या या बांगलादेशींची नावं आहेत.

Loading Comments