मुंबईत चोरी करणाऱ्यांना कर्नाटकातून अटक

 Dahisar
मुंबईत चोरी करणाऱ्यांना कर्नाटकातून अटक
मुंबईत चोरी करणाऱ्यांना कर्नाटकातून अटक
मुंबईत चोरी करणाऱ्यांना कर्नाटकातून अटक
मुंबईत चोरी करणाऱ्यांना कर्नाटकातून अटक
See all

दहिसर - येथे शक्तीनगर भागातल्या एका घरातून चोरी करून कर्नाटकाला पळून गेलेल्या 3 चोरांना पकडण्यात दहिसर पोलिसांना यश आलंय. संतोष राऊळ, मोहन सिंह आणि दर्शन अशी या चोरांची नावं आहेत. मोबाईलचं सिम कार्ड ट्रॅक करून या तिघांचा शोध लावण्यात पोलिसांनी यश मिळवलंय. दहिसर पूर्वेतील शुभम बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या कुसुम मौर्या यांच्या घरातून साडे तीन लाखांचा ऐवज आणि मोबाइल लंपास करण्यात आला होता. मौर्या घरी नसताना हा प्रकार झाला होता. परतल्यानंतर त्यांनी लगेचच दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यानंतर दहिसर पोलीस या चोरांचा शोध घेत होते. तब्बल 2 महिन्यानंतर त्यांचा मोबाईल चालू असल्याचं आढळलं. लोकेशन ट्रॅक केल्यावर हे तिघे कर्नाटकात असल्याचं समजलं. मग दहिसर पोलीस कर्नाटकात गेले आणि तिथून या तिघांना अटक करण्यात आली. याप्रकरणी दहिसर पोलीस अधिक तपास करत आहेत.

Loading Comments