ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर स्कॉर्पिओ कारला भीषण अपघात


ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर स्कॉर्पिओ कारला भीषण अपघात
SHARES

भरधाव येणारी स्कॉर्पिओ कार झाडाला आदळल्याने तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी रात्री इस्टर्न एक्स्प्रेस हाय-वेवर घडली. त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामधील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मुलुंड ते सीएसटीच्या दिशेने जाणाऱ्या स्कॉर्पिओत तीन जण होते. कार विक्रोळीहून निघाल्यानंतर कारचालकाचा कारवरील ताबा सुटला आणि कार सरळ एका झाडाला जाऊन आदळली. यामध्ये जखमी झालेल्या तिघांना स्थानिकांनी पोलिसांच्या मदतीने जवळच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणाचा तपास सध्या विक्रोळी पोलीस करत आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा