१५ लाखांच्या कोकेनसह ३ नायजेरियन अटकेत

मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विभागाने नायजेरियन तस्करांची धरपकड सुरू केली आहे. मालवणी पोलिसांनी ३ नायजेरियन तस्करांना अटक केली असून त्याच्याजवळून १५ लाख रुपयांचे १५२ ग्रॅम कोकेन हस्तगत केलं आहे. मागील ५ महिन्यांत पोलिसांनी ११ नायजेरियन तस्करांना अटक केली अाहे

१५ लाखांच्या कोकेनसह ३ नायजेरियन अटकेत
SHARES

नशेचा अंमल शहराच्या कानाकोपऱ्यात पोहचवणाऱ्या नायजेरियन तस्करांमुळे पोलिसांची डोकेदुखी दिवसेंदिवस वाढतच आहे. काही दिवसांपूर्वी या तस्करांनी कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांनाच दगडाने ठेचून मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विभागाने आता या नायजेरियन तस्करांची धरपकड सुरू केली आहे. मालवणी पोलिसांनी ३ नायजेरियन तस्करांना अटक केली असून त्याच्याजवळून १५ लाख रुपयांचे १५२ ग्रॅम कोकेन हस्तगत केलं आहे. मागील ५ महिन्यांत पोलिसांनी ११ नायजेरियन तस्करांना अटक केली अाहे.


तस्करीतला पैसा परदेशात बांधकामात

मुंबईच्या पश्चिम आणि उत्तर उपनगरात अंमली पदार्थांना मोठी मागणी असते. शहरात विविध अड्ड्यांवर कारवाई करत पोलिसांनी या नायजेरियन तस्करांना सळो की पळो करून सोडलं आहे. त्यामुळे हे तस्कर खारघर, नालासोपारा, मालाड (मालवणी), मनोरी, विरार, कल्याण या ठिकाणी लपून राहत अाहेत. फक्त तस्करीसाठी आणि सायबर क्राइमसाठी हे नायजेरियन तस्कर भारतात येऊन तळ ठोकत असल्याचं यापूर्वीच स्पष्ट झालं आहे. चोरीचा आणि तस्करीतला बहुतांश पैसा ते त्यांच्या देशात बांधकाम व्यवसायासाठी वापरत असल्याचं तपासात पुढं आलं आहे.


उच्चभ्रू तरुणांसाठी कोकेन

नुकतंच मालाडच्या मालवणी परिसरात ३ नायजेरियन तस्कर येत असल्याची माहिती मालवणी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिपक फटांगरे यांना मिळाली होती. मालवणीतील राठोडी गावात पोलिसांनी साध्या वेशात पाळत ठेवली होती. यावेळी फिलिप्स गाॅडवीन ( ३२), चुकावे मेका डेनियल अजहा (२४), मायकल आगबन्ना कौसी ख्री (२२) या तिघांना संशयावरून पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून पोलिसांनी १५ लाख रुपयांचे १५२ ग्रॅम कोकेन हस्तगत केले.  हे कोकेन शहरातील उच्चभ्रू वस्तीतील तरुणांसाठी आणल्याची कबूली त्यांनी दिली.  फोनवरून संपर्क करून हे तस्कर त्यांना अंमली पदार्थ घेण्यासाठी निर्जनस्थळी बोलवत असल्याचं चौकशीतून पुढे आलं आहे. या प्रकरणी मालवणी पोलिस अधिक तपास करत आहेत.



हेही वाचा -

सायबर चोरट्यांचा ७४ लाखांवर डल्ला; दोघांना अटक

अंधेरीत ३२ लाखांच्या कोकेनसह नायजेरियनला अटक




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा